Join us

Cotton Crop Management : कपाशीला पावसाचा फटका; कीड व रोगांवर तातडीचे उपाय करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 13:38 IST

Cotton Crop Management : सततचा रिमझिम पाऊस, ढगाळ हवामान आणि ओलसर माती या हवामानामुळे कपाशी पिकावर कीड व रोगांचा धोका वाढला आहे. विशेषतः फुलकिडे, जिवाणूजन्य करपा व आकस्मिक मर या समस्या शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. योग्य वेळी उपाययोजना न केल्यास उत्पादनावर मोठा परिणाम होऊ शकतो. चला तर जाणून घेऊया या परिस्थितीत कपाशीचे व्यवस्थापन कसे करावे. (Cotton Crop Management)

Cotton Crop Management : सततचा रिमझिम पाऊस, ढगाळ हवामान आणि ओलसर माती या हवामानामुळे कपाशी पिकावर कीड व रोगांचा धोका वाढला आहे. (Cotton Crop Management)

विशेषतः फुलकिडे, जिवाणूजन्य करपा व आकस्मिक मर या समस्या शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. योग्य वेळी उपाययोजना न केल्यास उत्पादनावर मोठा परिणाम होऊ शकतो. (Cotton Crop Management)

सद्यपरिस्थितीत कपाशी पिकाचे व्यवस्थापन

राज्यभरात रिमझिम पावसाचा जोर कायम आहे. सततचे ढगाळ हवामान व आर्द्रता यामुळे कपाशी पिकावर कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. 

विशेषतः फुलकिडे, जिवाणूजन्य करपा रोग आणि काही ठिकाणी दिसून येणारी आकस्मिक मर ही समस्या शेतकऱ्यांसमोर उभी राहत आहे. यावर योग्य वेळी उपाययोजना करणे गरजेचे आहे.

कपाशीवरील फुलकिडे व्यवस्थापन

फुलकिड्यांचा प्रादुर्भाव झाल्यास झाडांची वाढ खुंटते, पानं पिवळसर होतात व उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.

त्यासाठी या फवारण्या केल्यास उपयुक्त ठरतील 

निंबोळी अर्क ५% – एकराला शिफारस केलेल्या प्रमाणात फवारणी करावी.

फिप्रोनील ५% - ६०० मिली/एकर

स्पिनेटोरम ११.७% - १६० मिली/एकर

बुप्रोफेझीन २५% - ४०० मिली/एकर

वरील कीटकनाशकांचे प्रमाण सर्व प्रकारच्या फवारणी पंपासाठी समान आहे.

जिवाणूजन्य करपा रोग व्यवस्थापन

मागील वर्षी अनुभव आलेल्या प्रमाणे ढगाळ व दमट हवामानात जिवाणूजन्य करपा रोग वेगाने पसरतो. 

पाने व खोडावर तपकिरी डाग दिसतात आणि झाडे कमकुवत होतात.

प्रतिबंधात्मक उपाययोजना काय?

कॉपर ऑक्सीक्लोराईड ५०% - ५०० ग्रॅम/एकर फवारावे.

शेतात पाण्याचा निचरा होईल याची दक्षता घ्यावी.

पिकाची वाढ चांगली राहण्यासाठी संतुलित खत व्यवस्थापन करावे.

कापूस पिकातील आकस्मिक मर व्यवस्थापन

काही ठिकाणी कपाशीमध्ये आकस्मिक मर (Sudden wilt) विकृती आढळून येते. झाडे अचानक मरतात व उत्पादनाचे नुकसान होते.

यावर उपाययोजना

शेतात पाणी साचू देऊ नका. अतिरिक्त पाण्याचा त्वरित निचरा करा.

वापसा आल्यावर कोळपणी, खुरपणी व वखरणी करून माती हलकी करा.

खालीलपैकी कोणत्याही द्रावणाची आळवणी (ड्रेंचिंग) करावी 

१.५ किलो युरिया + १.५ किलो पालाश + २५० ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड / १०० लिटर पाणी→ प्रति झाड १५० मिली द्रावण द्यावे.

किंवा १ किलो १३:००:४५ + २ ग्रॅम कोबाल्ट क्लोराईड + २५० ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड / २०० लिटर पाणी → प्रति झाड १०० मिली द्रावण द्यावे.

शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या सूचना

* सततच्या पावसामुळे कपाशी पिकात बदलणारी परिस्थिती लक्षात घेऊन शेताची नियमित पाहणी करावी.

* योग्य वेळी फवारणी करून कीड व रोग नियंत्रणात ठेवावे.

* जमिनीचा पोत व पिकाच्या वाढीप्रमाणे खत व्यवस्थापन करावे.

* रोगराई नियंत्रणासोबतच पिकाला पोषकद्रव्यांचा पुरवठा योग्य पद्धतीने करणे आवश्यक आहे.

*सध्याच्या वातावरणात कपाशी पिकात रोग व कीड नियंत्रणासाठी शेतकरी सजग राहणे अत्यंत गरजेचे आहे. योग्य वेळी फवारणी, खत व्यवस्थापन आणि पाण्याचा निचरा या उपाययोजनांमुळे पिकाचे नुकसान टाळून उत्पादनात वाढ साधता येईल.

हे ही वाचा सविस्तर : Citrus Pest Management: मोसंबी व संत्र्याचे गुप्त शत्रू; सायला, काळी व पांढरी माशी नियंत्रणाचे उपाय वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रकापूसपीकपीक व्यवस्थापनशेती