Join us

महाडीबीटीद्वारे राबविल्या जाणाऱ्या योजनांची संपूर्ण यादी, इथे पहा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 16:27 IST

Mahadbt Schemes : महाडिबीटी पोर्टलद्वारे (Mahadbt Portal) विविध योजना राबविल्या जातात.

Mahadbt Schemes : महाडिबीटी पोर्टलद्वारे (Mahadbt Portal) विविध योजना राबविल्या जातात. यामध्ये वैयक्तिक लाभासह शेतकरी गटांसाठी योजना कार्यान्वित आहेत. नेमक्या कोणकोणत्या योजना राबविल्या जातात, लाभ दिले जातात, हे सविस्तर पाहुयात...  

अ) वैयक्तिक लाभार्थी / शेतकरी यांच्या करीता योजना -

१) राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान : (तृणधान्य, भरडधान्य, कडधान्य, गळीतधान्य, भात, कापूस, ऊस)

  • योजनेअंतर्गत लाभाच्या बाबी

पिकनिहाय आधारित सिंचन साधने, सुविधा व यंत्र अवजारे यासाठी लाभ दिला जातो. उदा. इलेक्ट्रीक मोटार, डिझेल इंजिन, पीव्हीसी पाईप्स, पेरणी यंत्र, बीबीएफ पेरणी यंत्र, मळणी यंत्र, तसेच बियाणे, पीक संरक्षण औषधे, सूक्ष्म मूलद्रव्ये इ. घटकांना लाभ दिला जातो. 

२) कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान (Farm Submission)३) राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना४) राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत कृषी यांत्रिकीकरण

  • योजनेअंतर्गत लाभाच्या बाबी

विविध यंत्रे/अवजारे घटकांकरीता विविध लाभ दिला जातो. उदा. रोटाव्हेटर, ट्रॅक्टर, पॉवर टिलर, नांगर, पेरणी यंत्र, BBF पेरणी यंत्र, मळणी यंत्र, प्लँटर, रिजर, पॉवर विडर, स्प्रेअर्स, रिपर व इतर यंत्रे.

५) एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान

  • योजनेअंतर्गत लाभाच्या बाबी

ट्रॅक्टर, पॉवर टिलर, हरितगृह, शेडनेट, कांदाचाळ, शेततळे अस्तरीकरण, प्लॅस्टिकमल्चिंग, क्षेत्रविस्तार घटक, पीक संरक्षण उपकरणे, काढणी पश्चात व्यवस्थापन (पॅक हाऊस, शीतगृह, रेफर व्हॅन, फिरते विक्री केंद्र इ.) जुन्या फळबागांचे पुर्नजीवन, आळंबी उत्पादन व नर्सरी.

६) प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (PMKSY) - ठिबक व तुषार सिंचन संच साधनांचा लाभ देण्यात येतो. 

७) SC/ST शेतकऱ्यांसाठी वैयक्तिक लाभाच्या योजना८) बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना९) डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना

  • योजनेअंतर्गत लाभाच्या बाबी

या योजनेंतर्गत नवीन विहीर बांधकाम, जुनी विहिर दुरुस्ती, इनवेल बोरिंग, पंपसंच, वीज जोडणी आकार, शेततळाचे प्लॅस्टिक अस्तरीकरण, सूक्ष्मसिंचन संच (ठिबक व तुषार), सोलर पंप

ब) शेतकरी गट / शेतकरी कंपनी / शेतकरी संघासाठी कृषी विभागाच्या योजना

१) कृषी यांत्रिकीकरण उपअभियान (कृषी औजारे बँक स्थापना)

  • योजनेअंतर्गत लाभाच्या बाबी

विविध यंत्रे / औजारे घटकांकरीता विविध लाभ दिला जातो. उदा. रोटाव्हेटर, ट्रॅक्टर, पॉवर टिलर, नांगर, पेरणी यंत्र, BBF पेरणी यंत्र, मळणी यंत्र, प्लँटर, रिजर, पॉवर विडर, स्प्रेअर्स, रिपर व इतर यंत्र. 

२) एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान

  • योजनेअंतर्गत लाभाच्या बाबी

पॉलीहाऊस, शेडनेट, हरितगृह, प्लॅस्टिक मल्चिंग, आळिंबी उत्पादन, प्राथमिक प्रक्रिया केंद्र. नर्सरी, काढणी पश्चात व्यवस्थापन (कांदाचाळ, रेफरव्हॅन इ.)

टॅग्स :कृषी योजनाशेतीशेती क्षेत्र