Join us

Chilli Crop Protection : फुलपाखरासारखी मिरची बोकड्याने करपली; जाणून घ्या उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 13:00 IST

Chilli Crop Protection : फुलासारखी जपलेली मिरची काही दिवसांत करपते, दर मात्र मातीमोल होतात. हंगामात शेतकऱ्याला आधार वाटणारी मिरची यंदा बोकड्याच्या रोगामुळे संकटात आली आहे. जाणून घ्या उपाय (Chilli Crop Protection)

Chilli Crop Protection : फुलासारखी जपलेली मिरची काही दिवसांत करपते, दर मात्र मातीमोल होतात. हंगामात शेतकऱ्याला आधार वाटणारी मिरची यंदा बोकड्याच्या रोगामुळे संकटात आली आहे. (Chilli Crop Protection)

मेहनत, उधारी आणि महागडी औषधे यामागे गढलेल्या शेतकऱ्याला नफा तर दूरच, पण हातात काहीच राहत नाही. अशा वेळी योग्य व्यवस्थापन करून हा रोग रोखता कसा येईल? (Chilli Crop Protection)

फुलासारखी जपलेली मिरची काही दिवसांत करपते, दर मात्र मातीमोल होतात. हंगामात शेतकऱ्याला आधार वाटणारी मिरची यंदा बोकड्याच्या रोगामुळे संकटात आली आहे. मेहनत, उधारी आणि महागडी औषधे यामागे गढलेल्या शेतकऱ्याला नफा तर दूरच, पण हातात काहीच राहत नाही. 

मिरची हे शेतकऱ्यांसाठी हंगामी आशेचे पीक असते. हिरवी मिरची, लाल मिरची, लवंगी आणि ढोबळी या सर्व प्रकारांना नेहमी मागणी असते. मात्र, दर घसरले की नफा उडतोच; त्यातच जर मिरचीच्या प्लॉटमध्ये 'बोकड्या' (Blight) रोग शिरकाव करतो, तर शेतकऱ्यांची मेहनत, उधारी, खते, औषधांचा खर्च वाया जातो. (Chilli Crop Protection)

काही दिवसांत संपूर्ण प्लॉट जळून गेलेला दिसतो आणि शेतकऱ्याच्या डोळ्यांत पाणी येतं. मिरचीचं पीक फुलपाखरासारखं जपून उभं करावं लागतं. पण आजही बाजारातील अस्थिर दर, वाढता रोगप्रादुर्भाव, आणि उधारी यामुळे मिरची उत्पादक संकटात सापडतो आहे.

बोकड्या रोग म्हणजे काय?

बोकड्या हा मिरचीवरील एक रोग आहे. दमट हवामानात हा झपाट्याने पसरतो. जमिनीतील सतत ओलावा, पाणी साचणे आणि योग्य हवेचा अभाव यामुळे झाडावर तपकिरी डाग दिसतात. पाने जळाल्यासारखी दिसतात, फांद्या करपतात आणि फुलं व मिरच्या वाळून जातात. परिणामी मिरचीचं बाजारमूल्य घसरतं आणि नफा शून्यावर येतो.

बोकड्याची प्रमुख कारणं

प्लॉटमध्ये पाण्याचा निचरा न होणे.

दमट हवामान आणि सततचा ओलावा.

झाडांमध्ये योग्य अंतर न ठेवणे.

झाडांवर वाऱ्याचा योग्य प्रवाह न होणे.

वेळच्या वेळी फवारणी न करणे.

मिरची प्लॉटचं योग्य व्यवस्थापन

पेरणीपूर्व उपाययोजना

बियाण्यावर ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम प्रति किलो बियाणे प्रक्रिया करावी.

जमिनीत पेंडसार, ट्रायकोडर्मा व मोकळं अंतर ठेवून पीक उभं करावं.

पिकात उपाययोजना

अंतर मशागत करून झाडांमध्ये मोकळी जागा ठेवावी.

पाण्याचा निचरा नीट होईल याची खात्री करावी.

हवेशीर आणि स्वच्छ प्लॉट ठेवावा.

फवारण्या

७–१० दिवसांच्या अंतराने नियमित फवारणी करावी.

कार्बेन्डाझिम + मॅन्कोझेब २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

पहिल्या लक्षणांवरच फवारणी करून रोगाचा प्रसार थांबवावा.

जैविक पर्याय

ट्रायकोडर्मा व मातीमिश्रण प्लॉटमध्ये टाकावे.

रासायनिक फवारणीपेक्षा नियमित जैविक पद्धतीने प्रतिबंधक उपाय करावेत.

कोणती खते द्याल?

जमिनीतून मुळांसाठी : १२:६१:०० (युरिया मुक्त) फॉस्फरस खत

फळधारणा व चव वाढीसाठी : ०:५२:३४ (फॉस्फेट + पोटॅश), १९:१९:१९ (संतुलित मिश्र खत) यांची निवड करावी.

बाजारभाव आणि नफा

दर घसरले तरी खर्च वाढतो, उधारी वाढते. म्हणून योग्य वेळी उत्पादनाचे नियोजन करून, फवारण्या वेळेवर करून व ओलावा टाळून उत्पादन टिकवणे हेच मार्ग आहे.

मिरची शेतकऱ्यांनी वेळच्या वेळी प्लॉटवर लक्ष ठेवून, योग्य फवारण्या व पाणी व्यवस्थापन करून'बोकड्या'थोपवायला हवा. 

मिरचीचं फुलपाखरासारखं नाजूक पीक बाजारात मातीमोल होऊ नये, म्हणून रोगट झाडं वेळीच काढून टाकणं, स्वच्छ प्लॉट ठेवणं आणि बाजारातील स्थिती पाहून विक्री करणं हाच मार्ग आहे.

हे ही वाचा सविस्तर : Irregular monsoon in Marathwada : पावसाचा ताळमेळ बिघडला; मराठवाड्यात कधी ढगफुटी, कधी दुष्काळ जाणून घ्या कारणं

टॅग्स :शेती क्षेत्रमिरचीपीकपीक व्यवस्थापन