Join us

CCI Cotton Farmers App : सीसीआयचे 'कापस किसान' ॲप; शेतकऱ्यांसाठी कापसाची ऑनलाइन नोंदणी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 13:47 IST

CCI Cotton Farmers App : केंद्रीय कपूस निगम लिमिटेड (सीसीआय) शेतकऱ्यांसाठी 'कापस किसान' मोबाइल ॲप उपलब्ध करून दिले आहे. यंदा सन २०२५-२६ सत्रासाठी कापसाच्या विक्रीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य आहे. (CCI Cotton Farmers App)

CCI Cotton Farmers App : केंद्रीय कपूस निगम लिमिटेड (सीसीआय) शेतकऱ्यांसाठी 'कापस किसान' मोबाइल ॲप उपलब्ध करून दिले आहे. यंदा सन २०२५-२६ सत्रासाठी कापसाच्या विक्रीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य आहे. (CCI Cotton Farmers App)

किमान आधारभूत किंमत ८,११० रुपये प्रति क्विंटल जाहीर करण्यात आली असून नोंदणीची सुरुवात १ सप्टेंबर पासून होणार आहे आणि अंतिम मुदत ३० सप्टेंबर आहे.(CCI Cotton Farmers App)

केंद्रीय कपूस हंगामासाठी (सन २०२५-२६) भारतीय कापूस निगम लिमिटेड (सीसीआय) शेतकऱ्यांच्या ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेस सुरुवात करत आहे. (CCI Cotton Farmers App)

यंदा शेतकऱ्यांसाठी ‘कपास किसान’ हे मोबाइल ॲप उपलब्ध करून देण्यात आले आहे, ज्याद्वारे शेतकरी स्वतः च्या मोबाइलवरून नोंदणी करू शकतील.(CCI Cotton Farmers App)

नोंदणीची महत्त्वाची माहिती

नोंदणी कालावधी: १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२५

ॲप डाउनलोड: गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल स्टोरवरून उपलब्ध

किमान आधारभूत किंमत (हमीदर): ८,११० रुपये प्रति क्विंटल

नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत योजने अंतर्गत कापूस विक्री करता येणार नाही.

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

शेतकऱ्यांनी ॲपवर नोंदणी करताना खालील कागदपत्रे अपलोड करावी लागतील

जमिनीची नोंद / मालकी दाखला

महसूल विभागाकडून प्रमाणित केलेला कापसाची पेरणी दाखला

वैध आधार कार्ड

हमीदराने कापूस विक्रीसाठी दिलेल्या मुख्य सूचना

* कापसाची ई-पीक पाहणी करणे आवश्यक

* सात-बारा नोंद करणे अनिवार्य

* खरेदीचे सर्व पेमेंट बँक खात्याला आधार लिंक करून केले जातील

* आधार कार्डला मोबाइल नंबर लिंक करणे आवश्यक

* पोस्टल बँक खात्यांसाठी पैसे स्वीकारण्याची मर्यादा वाढवलेली असणे आवश्यक

'कपास किसान' ॲपची सोय

सीसीआयने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी मोबाईल ॲप उपलब्ध करून दिले आहे.

सहज ऑनलाइन नोंदणी करू शकतात

कापसाची खरेदी प्रक्रिया सुरळीत पार पाडू शकते

पेमेंट थेट बँक खात्यात मिळवू शकतात

केंद्रीय कपूस निगमाचे 'कपास किसान' ॲप  शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन नोंदणीसाठी सोयीचे व सुरक्षित माध्यम ठरत आहे. यंदा शेतकऱ्यांनी १ ते ३० सप्टेंबर दरम्यान नोंदणी करून हमीदरावर कापूस विक्रीची तयारी करणे अनिवार्य आहे.

कापस किसान ॲपची वैशिष्ट्ये

ऑनलाइन नोंदणीची सुविधा

शेतकरी स्वतः च्या मोबाइलवरून कापस विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी करू शकतात.

नोंदणीसाठी जमीन नोंद, पेरणी दाखला आणि आधार कार्ड यांचा वापर केला जातो.

सुलभ व सुरक्षित प्रक्रिया

ॲपवर शेतकऱ्यांची सर्व माहिती सुरक्षित ठेवली जाते.

आधार-लिंक बँक खात्याद्वारे पेमेंट थेट शेतकऱ्यांच्या खात्यात होते.

हमीदरावर कापस विक्रीस मार्गदर्शन

शेतकऱ्यांना हमीदरावर कापस विक्रीसाठी आवश्यक सूचना आणि अटी ॲपवर उपलब्ध.

ई-पीक पाहणी, सात-बार नोंदणी आणि इतर महत्त्वाचे स्टेप्स ॲपवर दाखवले जातात.

सुलभ पेमेंट सुविधा

पेमेंट थेट आधार लिंक बँक खात्यात मिळते, त्यामुळे व्यवहार जलद व सुरक्षित.

पोस्टल बँक खात्यांसाठी मर्यादा वाढवण्याचे पर्याय अॅपवर.

डाऊनलोड आणि वापर सुलभ

ॲप  गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल स्टोरवरून उपलब्ध.

सोपी इंटरफेस, जे शेतकऱ्यांसाठी सहज समजण्यासारखे आहे.

ॲपवर पूर्ण माहिती व मार्गदर्शन

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे, अंतिम मुदत, दर माहिती, आणि संपर्क तपशील ॲपवर उपलब्ध.

शेतकऱ्यांना संपूर्ण प्रक्रिया एकाच ठिकाणी पूर्ण करता येते.

हे ही वाचा सविस्तर : Crop Loan : शेतकऱ्यांना घरबसल्या मिळणार पीक कर्ज मंजुरी; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

टॅग्स :शेती क्षेत्रकापूसशेतकरीशेती