Join us

Bhogwatdar Jamin Kharedi : भोगवटादार वर्ग 2 च्या जमिनी खरेदी-विक्री करता येतात का? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 15:44 IST

Bhogwatdar Jamin Kharedi : या जमिनी शासनाने काही विशिष्ट कारणांसाठी दिल्या आहेत आणि त्या खरेदी-विक्री करताना काही नियमांचे पालन करावे लागते.

Bhogwatdar Jamin Kharedi : भोगवटादार वर्ग 2 जमिनी खरेदी (Jamin Kharedi) करणे, म्हणजे अशा जमिनी खरेदी करणे ज्यांच्या मालकीवर काही निर्बंध आहेत. या जमिनी शासनाने काही विशिष्ट कारणांसाठी दिल्या आहेत आणि त्या खरेदी-विक्री करताना काही नियमांचे पालन करावे लागते. जाणून घेऊया सविस्तर... 

जमीन खरेदी करताना सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे भूधारणा पद्धत सातबारा उताऱ्यावर भूधारणा पद्धतीची नोंद केलेली असते. जर सातबाऱ्यावर भोगवटादार वर्ग १ पद्धत असेल, तर भोगवटादार वर्ग १ या पद्धतीमध्ये अशा जमिनी येतात, ज्यांचं हस्तांतरण करण्यावर शासनाचे निर्बंध नसतात. 

शेतकरीच या जमिनीचा मालक असतो. म्हणजे ही जमीन विक्री करणाऱ्याच्या स्वतःच्या मालकीची असून ती खरेदी करताना विशेष अडचण येत नाही, पण, सातबाऱ्यावर भोगवटादार वर्ग- २ असं नोंद केलं असेल, तर या जमिनींचं हस्तांतर करण्यावर शासनाचे निर्बंध आहेत. 

सरकारी अधिकाऱ्यााच्या परवानगीशिवाय या जमिनींचं हस्तांतर होत नाही. जर सातबाऱ्यावर भोगवटादार वर्ग २ असं असेल तर सक्षम अधिकाऱ्याची परवानगी घेऊनच ती जमीन खरेदी करावी लागते. याव्यतिरिक्त सरकारी पट्टेदार या प्रकारच्या जमिनी येतात. यामध्ये सरकारी मालकीच्या पण भाडेतत्वावर दिलेल्या जमिनी असतात. 

- ॲड. वैजनाथ दिपकराव वांजरखेडेकायदे विषयक अभ्यासक तथा मोडी लिपी लिप्यंतरकार पुराभिलेख संचालनालय महाराष्ट्र शासन प्रमाणित 

टॅग्स :जमीन खरेदीकृषी योजनाशेती