Join us

एकदा आला तर तीस वर्षे मातीतून जात नाही, केळीवरील पनामा रोग, असा करा बंदोबस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 14:45 IST

Panama On Banana : जो एकदा शेतात आल्यास ३० वर्षापर्यंत मातीतून जात नाही. या रोगाला 'फ्युजेरियम विल्ट' असेही म्हणतात.

Panama On Banana :    केळीच्या पिकाला 'पनामा' नावाच्या बुरशीमुळे होणाऱ्या रोगाचा मोठा धोका असतो. जो एकदा शेतात आल्यास ३० वर्षापर्यंत मातीतून जात नाही. या रोगाला 'फ्युजेरियम विल्ट' असेही म्हणतात.

यावल येथील केळी प्रशिक्षण वर्गात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना प्रमुख मार्गदर्शक प्रा. विजयराज गुजर यांनी ही माहिती दिली. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला होता. 

काय म्हणतात शेतकरीप्रा. गुजर यांनी सांगितले की, पनामा रोग उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये केळीच्या लागवडीसाठी एक मोठा धोका आहे. पनामा रोगाची लक्षणे आणि प्रसार'फ्युजेरियम ऑक्सिस्पोरम' ही बुरशी केळीच्या कोवळ्या मुळांवर किंवा मुळांच्या तळावर हल्ला करते. यामुळे मुळांच्या गाठी आणि पानांच्या तळांवर वेगाने हल्ला होतो. ज्या शेतात या रोगाचा प्रादुर्भाव होतो, त्या शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे.

प्रा. किरण जाधव यांनी केळीच्या लागवडीबद्दल तर प्रा. अंजली मेढे यांनी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले. सभापती राकेश फेगडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी सभापती नारायण चौधरी, हर्षल पाटील, खरेदी-विक्री संघाचे संचालक उमेश फेगडे आदी उपस्थित होते.

पनामा रोगामुळे काय होते

  • पानांचे अचानक वाळणे व गळणे मुळांवर गाठी व सडखोडामध्ये तपकिरी पट्टे दिसतात.
  • हा आजार मातीतून व पाण्याद्वारे संक्रमित होतो. 
  • एकदा शेतात आल्यास रोग ३० वर्षापर्यंत मातीत राहतो.

 

पनामा रोगापासून बचावासाठी उपाययोजनारोगमुक्त रोपांची निवड - विश्वसनीय स्त्रोतांकडूनच रोपे खरेदी करावीत.शेतामधील निचरा सुधारावा - पाणी साचणार नाही याची काळजी घ्याफेरपालट करा. एकाच जमिनीत सतत केळी न लावता अन्य पिके घ्यावीत. संसर्ग झालेला भाग वेगळा करणे -रोगट झाडे उखडून नष्ट करावीत जमिनीची स्टीमिंग / सौर निर्जंतुकीकरण शक्य असल्यास करावे. 

Mahadbt Lottery List : महाडीबीटीवर फळबाग लागवड योजनेची निवड यादी आली, तुमचं नाव चेक करा!

टॅग्स :केळीशेती क्षेत्रपीक व्यवस्थापनशेती