Join us
Daily Top 2Weekly Top 5

Ayushman Bharat health scheme : 'आयुष्मान भारत' आणि 'आभा' कार्ड एकच नाही; जाणून घ्या नेमका काय फरक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 11:27 IST

Ayushman Bharat health scheme : आरोग्य योजनांबाबत अनेक नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. आयुष्यमान भारत(Ayushman Bharat) योजना आणि आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट (ABHA) कार्ड हे एकच असल्याचा समज अनेकांचा आहे. मात्र प्रत्यक्षात या दोन्ही योजना उद्देश आणि लाभाच्या दृष्टीने पूर्णपणे वेगळ्या आहेत.(Ayushman Bharat health scheme)

Ayushman Bharat health scheme :केंद्र सरकारच्या आरोग्य योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात असले तरी आयुष्यमान भारत(Ayushman Bharat) योजना आणि आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट (ABHA) म्हणजेच ‘आभा’ कार्ड याबाबत अनेक नागरिकांमध्ये अजूनही संभ्रम दिसून येत आहे.(Ayushman Bharat health scheme)

दोन्ही योजना आरोग्य क्षेत्राशी संबंधित असल्यामुळे अनेकांना 'आभा कार्ड' हेच आयुष्मान भारत योजनेचे कार्ड आहे का, असा प्रश्न पडतो. प्रत्यक्षात या दोन योजना उद्देश आणि वापराच्या दृष्टीने पूर्णपणे वेगळ्या आहेत.(Ayushman Bharat health scheme)

केंद्र सरकारने २०१८ मध्ये आयुष्मान भारत योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि पात्र कुटुंबांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य उपचार मिळण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. (Ayushman Bharat health scheme)

शासकीय तसेच मान्यताप्राप्त खासगी रुग्णालयांमध्ये या योजनेचा लाभ घेता येतो. राज्यातील पात्र लाभार्थ्यांना पिवळे, केशरी किंवा पांढरे रेशनकार्ड असल्यास त्यांची नोंद पोर्टलवर दिसणे आवश्यक असते.(Ayushman Bharat health scheme)

कुटुंबातील सदस्यसंख्या कितीही असली तरी पात्र कुटुंबाला दरवर्षी उपचारासाठी ५ लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाते.

दरम्यान, 'आभा कार्ड' ही स्वतंत्र डिजिटल आरोग्य ओळख प्रणाली आहे. केंद्र सरकारने २०२१ मध्ये ही सुविधा सुरू केली. आभा कार्ड म्हणजे १४ अंकी डिजिटल हेल्थ आयडी, ज्यामध्ये व्यक्तीचा संपूर्ण वैद्यकीय इतिहास, तपासण्या, औषधोपचार आणि आरोग्याशी संबंधित नोंदी सुरक्षितपणे जतन केल्या जातात. हे कार्ड एखाद्या डिजिटल हेल्थ अकाउंटप्रमाणे काम करते.

आभा कार्ड असल्यास रुग्ण देशात कुठेही उपचारासाठी गेल्यास त्याला वैद्यकीय कागदपत्रे सोबत नेण्याची गरज राहत नाही.

डॉक्टरांना या कार्डद्वारे रुग्णाच्या पूर्वीच्या उपचारांची आणि आजारांची माहिती मिळू शकते, त्यामुळे उपचार करणे अधिक सोपे होते.

विशेषतः शासकीय रुग्णालये, जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपचार घेताना आभा कार्ड असल्यास संबंधित आजार आणि उपचारांची डिजिटल नोंद ठेवली जाते.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी सांगितले की, आयुष्मान भारत योजना आणि आभा कार्ड या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत. आयुष्मान भारत योजना आर्थिक मदत देणारी आरोग्य विमा योजना आहे, तर आभा कार्ड हे डिजिटल आरोग्य नोंदी ठेवण्याचे माध्यम आहे.

शासकीय रुग्णालयांप्रमाणेच खासगी रुग्णालयांमध्येही आभा कार्डचा वापर वाढवण्यासाठी शासनाने सक्ती करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

आरोग्य सेवांचा अधिक प्रभावी लाभ मिळण्यासाठी नागरिकांनी दोन्ही योजनांची माहिती करून घेणे आवश्यक असून, पात्र लाभार्थ्यांनी आयुष्मान भारत कार्ड तयार करून घ्यावे तसेच प्रत्येकाने आभा कार्ड बनवून आपल्या आरोग्य नोंदी डिजिटल स्वरूपात सुरक्षित ठेवाव्यात, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.

* आयुष्मान भारत योजना काय आहे?

आयुष्मान भारत ही केंद्र सरकारची आरोग्य विमा योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार मिळतात.

शासकीय आणि मान्यताप्राप्त खासगी रुग्णालयांत उपचार करता येतात.

मुख्यतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी ही योजना सुरू करण्यात आली.

कुटुंबातील सदस्यसंख्या कितीही असली तरी उपचारासाठी एकूण ५ लाख रुपयांपर्यंतचा खर्च सरकारकडून केला जातो.

* आभा कार्ड काय आहे?

आभा कार्ड हे डिजिटल हेल्थ आयडी आहे.

यात १४ अंकी हेल्थ आयडी नंबर असतो.

या आयडीमध्ये व्यक्तीच्या सर्व वैद्यकीय नोंदी, तपासण्या, उपचारांचा इतिहास डिजिटल स्वरूपात सुरक्षित ठेवला जातो.

देशात कुठेही उपचार घेताना डॉक्टरांना रुग्णाचा पूर्वीचा वैद्यकीय इतिहास सहज पाहता येतो.

'आयुष्मान भारत' आणि 'आभा' कार्डातील फरक ठाऊक आहे का?

मुद्दाआयुष्मान भारतआभा कार्ड
प्रकारआरोग्य विमा योजनाडिजिटल हेल्थ आयडी
फायदा५ लाखांपर्यंत मोफत उपचारवैद्यकीय नोंदी डिजिटल स्वरूपात
उद्देशउपचारासाठी आर्थिक मदतआरोग्य इतिहास सुरक्षित ठेवणे
लाभार्थीपात्र व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबेकोणताही नागरिक बनवू शकतो

दोन्ही योजना वेगळ्या असून त्यांचा उद्देशही वेगळा आहे. नागरिकांनी दोन्ही योजनांची योग्य माहिती करून घेणे आवश्यक आहे.

हे ही वाचा सविस्तर : Pack House Scheme : शेतमालाचे नुकसान टाळा; 'पॅक हाऊस' उभारणीसाठी मिळणार लाखोंचे अनुदान

English
हिंदी सारांश
Web Title : Ayushman Bharat and ABHA cards: Understanding the key differences.

Web Summary : Ayushman Bharat offers ₹5 lakh health coverage, while ABHA creates a digital health record. Ayushman provides financial aid; ABHA stores medical history for easy access anywhere. Both schemes are distinct and beneficial.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेती