Join us
Daily Top 2Weekly Top 5

आंबा बागेतील पालवी आणि मोहोरावरील भुरी रोग कसा ओळखायचा, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 21:02 IST

Amba Bag Vyavsthapan : पालवी आणि मोहोरावरील भुरी रोग हा एक बुरशीजन्य आजार आहे, जो आंब्याच्या झाडांना लागतो.

Amba Bag Vyavsthapan :    पालवी आणि मोहोरावरील भुरी रोग हा एक बुरशीजन्य आजार आहे, जो आंब्याच्या झाडांना लागतो. विशेषतः डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात जेव्हा हवामान उष्ण आणि दमट असते. यावेळी हा भुरी रोग दिसून येतो. याची लक्षणे लक्षणे काय? व्यवस्थापन कसे करायचे ते पाहुयात.... 

भुरी रोग आणि लक्षणे 

  • बुरशीची बीजे कोवळ्या पालवीवर किंवा मोहोरावर रूजून येताच त्यांचा मुळांसारखा भाग पेशीमध्ये शिरुन पेशीतील अन्नरस शोषून घेतो. 
  • अशा बुरशीवर असंख्य बीजे तयार होऊन कालांतराने त्यांचा वाऱ्यामार्फत पुढील प्रसार होतो. 
  • रोग कोवळ्या पालवीवर आल्यास पाने तांबुस रंगाची होऊन कालांतराने वाळतात, गळून पडतात. 
  • मोहोरावर रोगाची पहिली लागण त्याच्या शेंडयाजवळ होऊन नंतर तो सर्वत्र पसरतो. 
  • बुरशीच्या वाढीमुळे पेशीतील अन्नरस शोषला जाऊन मोहोराच्या वाढीवर दुरूष्परिणाम होतो. 
  • रोगाची लागण मोहोर येताच मोठया प्रमाणात झाल्यास, फळधारणा होण्यापूर्वीच फुले गळून पडतात. 
  • फळधारणेनंतर रोग उद्भल्यास फळांचे देठ सुकून त्यांची गळ होते.

व्यवस्थापनहेक्झाकोनॅझोल (५ ईसी) ०.५ मि.लि. किंवा सल्फर (८० डब्ल्यूजी) २ ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी.

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी 

English
हिंदी सारांश
Web Title : Mango Powdery Mildew: Identify and Manage Disease on Shoots & Flowers

Web Summary : Powdery mildew affects mangoes, especially in warm, humid weather. It causes reddish leaves, flower drop, and fruit shedding. Manage with Hexaconazole or Sulfur sprays.
टॅग्स :आंबापीक व्यवस्थापनशेतीशेती क्षेत्र