Join us

Sindoor : सिंदूर कोणत्या झाडांपासून बनतं? या वनस्पतींबद्दल जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 14:24 IST

Sindoor : भारतीय संस्कृतीत महत्त्व असलेले सिंदूर (Sindur) कसे तयार केले जाते, हे समजून घेऊया.

Sindoor :  भारतात सिंदूर (Sindoor) हे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. इतके महत्त्व असलेले सिंदूर कसे तयार केले जाते, हे समजून घेऊया. तर सिंदूर हे प्राथमिकरीत्या एका वनस्पतीपासून बनवले जाते. वनस्पतीला कुमकुम ट्री (Kumkum Tree) किंवा कॅमल ट्री म्हणतात. ही एक औषधी वनस्पती आहे, याच झाडाविषयी, तसेच सिंदूर बनविण्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात....  

बियांपासून सिंदूर तयार केला जातो एका झाडापासून दीड किलोपर्यंत बिया तयार होतात. साधारणपणे त्याच बिया रंग तयार करण्यासाठी वापरल्या जातात. त्यात लाल रंगाचे प्रमाण जास्त असते. त्यापासून मिळणारे रंग किंवा रंगद्रव्ये सौंदर्यप्रसाधनामध्ये देखील वापरली जातात. सौंदर्यप्रसाधनांमध्ये, याचा वापर लिपस्टिक, केसांचा रंग, नेलपॉलिश आणि सिंदूर (Sindoor) बनवण्यासाठी केला जातो. याशिवाय नैसर्गिक रंग बनवण्यासाठी देखील वापरला जातो. 

सिंदूरवर संशोधन सुरू आहेसिंदूरचे महत्त्व लक्षात घेता, बिहार कृषी विद्यापीठात (BAU) त्यावर महत्त्वाचे संशोधन सुरू आहे. हे संशोधन नैसर्गिक, विषारी नसलेले आणि पर्यावरणपूरक सिंदूर विकसित करण्यावर लक्ष केले जात आहे. सिंथेटिक सिंदूरमध्ये आढळणारी रसायने आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे, शास्त्रज्ञांचे मत आहे. हे लक्षात घेऊन, या प्रकल्पात नैसर्गिक सिंदूरचा रंग स्थिर राहील, शेल्फ-लाइफ वाढेल आणि उत्पादनाची गुणवत्ता सुधारेल अशा निष्कर्षण, स्थिरीकरण आणि फॉर्म्युलेशन तंत्रांचा वापर केला आहे.

कुमकुमची लागवड कशी केली जाते?हे उष्ण हवामानात लागवड केले जाते आणि मुबलक सूर्यप्रकाश असलेल्या भागात लागवड केली जाते.  बियाण्यांपासून किंवा कलमांपासून लागवड केली जाते. घरी कुंडीच्या मातीत देखील लावू शकता. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीशेतकरीसांस्कृतिक