Join us

Humani Control : एक अळी बारा पिकांना त्रास देई, असा करा हुमणी अळीचा बंदोबस्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 13:35 IST

Humani Ali : महाराष्ट्रामधे होलोट्रीचीया सेरेंटा या प्रजातीमुळे प्रामुख्याने सोयाबीन, कापूस, तूर, या पिकाचे नुकसान होते.

Humani Ali : हुमणी अळी (होलोट्रीवीया प्रजाती) ही एक बहुभक्षी किड असून महाराष्ट्रामधे होलोट्रीचीया सेरेंटा या प्रजातीमुळे प्रामुख्याने सोयाबीन, कापूस, तूर, या पिकाचे नुकसान होते. पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांनी सायंकाळच्या वेळी शेतातील कडुलिंब, बोर आणि बाभुळ या झाडांचे निरीक्षण करावे. त्यासाठी झाडाखाली प्रकाश सापळे लावावे. 

एक मादी भुंगा नष्ट झाल्यास त्यापासुन तयार होणाऱ्या ४० ते ५० अळयांवा बाश होतो. सातत्याने हि किड येणाऱ्या भागात बाभुळ, कार्मिक आणि बोर हयासारख्या झाडावर किटकनाशकाची पहिली फवारणी करावी. भुंग्यांची संख्या प्रत्येक झाडावर सरासरी २० अगर त्यापेक्षा जास्त असेल तर नियंत्रणाची मोहीम राबवावी. किटकनाशकांचा वापर करतांना मजुरांना संरक्षण साधने पुरवावीत. गरज भासल्यास दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर ३ आठवडयांनी करावी.

या पिकांवर परिणाम हुमणी अळीची प्रौढ मादी पाऊस पडल्यानंतर जमिनीत अंडी देते. हया किडींची अळी अवस्था नुकसान कारक असून ती विविध पिकांच्या मुळावर आपली उपजीवीका करते, उदा. ज्वारी, बाजरी, मका, भात, गहु, ऊस, मिरची, मुंग, करडई, वांगी, कापूस, आणि सुर्यफुल ई. पिकाची मुळे खाल्यामुळे पिके उधळून जमिनीवर कोलमडून पडतात. 

या किडींचे जिवनचक्र या किडींचे जिवनचक्र एक वर्षाचे असून ती आपली उपजीवीका जमिनीमधे करते. हि किड अळी अवस्थेत ६ ते ८ महिण्याची असून या अवस्थेत खरीप व रब्बी पिकांची मुळे खाऊन पिकाचे नुकसान करते. एक मादी दररोज एक अंडी घालते. एक मादी मे ते जुलै महिण्यात पोषक वातावरणानुसार ४० ते ५० अंडी घालते. अंडी ३ ते ५ दिवसात उबवून त्यातून बारीक पिवळसर अळया निघतात. त्या अळया गवताच्या कुंजलेल्या मुळ्या खाऊन जगतात. पूर्ण वाढ झालेली अळी ३ त ५ सेंमी रुंद, मांसळ पांदूरकी अथवा मळकट पुढ-या रंगाची "C" आकाराची असते.

लक्षणे काय दिसतात? शेतात निरिक्षण घेतेवेळी एकरी २० ठिकाणचे मातीचे नमुने (१ फुट x १ फुट x ६ इंच खोल) घेउन त्यात हुमनी अळया आहेत का? ते शोधावे, तसेच पिकामधे विशिष्ट ओळीमधे प्रादूर्भावग्रस्त झाडाची पाने पिवळी पडून सुकतात. अशी झाडे आढळल्यास ती मुळासकट उपटुन मुळे कुरतडलेली आहेत का? हे पहावे.

अशी करा उपाययोजना 

  • सौम्य प्रादुर्भाव तुरकळ ठिकाणीच असल्यास जैविक मित्र बुरशी मेटॅरायझियम ४ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून पिकाच्या मुळाशी आळवणी करावी किंवा मेटॅरायझियम १ किलो प्रति १०० किलो शेणखतात मिसळून प्रति हेक्टरी शेतात फेकावे. 
  • मित्र बुरशीचा वापस आवश्यक असते.
  • लक्षणीय प्रादुर्भाव असल्यास व्यवस्थापनाकरीता खालील पैकी एका रासायनिक किटकनाशकांचा वापर करावा. 
  • फिप्रोनील ४० टक्के + इमिडॅक्लोप्रिड ४० टक्के दानेदार ५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात घेऊन द्रावण खोडांजवळ टाकावे. 
  • किंवा कार्बोफ्यूरॉन ३ टक्के दानेदार ३३.३० किलो किंवा थायोमेथोक्झाम ०.४ टक्के बायफेनथ्रिन ०.८ टक्के दानेदार १२ किलो प्रति हेक्टर किंवा थायोमेथोक्झाम ०.९ टक्के फिप्रोनिल २ टक्के दानेदार १२ ते १५ किलो प्रति हेक्टर खोडांजवळ जमिनीत ओलावा असतांना मातीत मिसळून दयावे.

- डी. बी. उंदीरवाडे, विभाग प्रमुख, कीटकशास्त्रज्ञ विभाग, डॉ. पं. दे. कृ. वि.अकोला

टॅग्स :पीक व्यवस्थापनशेतीशेती क्षेत्रखरीप