Join us

Adivasi Women Empowerment : महिला सक्षमीकरणासाठी राणी दुर्गावती योजनेत अर्ज करण्याची संधी वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 12:01 IST

Adivasi Women Empowerment : राज्य शासनाने आदिवासी महिलांसाठी सुरू केलेल्या ‘राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण’ योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे महिलांना स्वावलंबी होण्याची संधी मिळणार असून शिक्षण, कौशल्य विकास, आरोग्य आणि आर्थिक सक्षमीकरणावर भर दिला गेला आहे. (Adivasi Women Empowerment)

Adivasi Women Empowerment : भारताच्या इतिहासातील शूर, बुद्धिमान आणि देशभक्त राणी राणी दुर्गावती यांच्या नावावर महाराष्ट्र सरकारने आदिवासी महिलांसाठी ‘राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण’ योजना सुरू केली आहे.  (Adivasi Women Empowerment)

राज्य शासनाने आदिवासी महिलांसाठी सुरू केलेल्या ‘राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण’ योजनेअंतर्गत वैयक्तिक व्यवसायासाठी ५० हजार आणि सामूहिक व्यवसायासाठी ७.५ लाख रुपये पूर्ण अर्थसाहाय्य मिळणार आहे. (Adivasi Women Empowerment)

या योजनेमुळे महिलांना स्वावलंबी होण्याची संधी मिळणार असून शिक्षण, कौशल्य विकास, आरोग्य आणि आर्थिक सक्षमीकरणावर भर दिला गेला आहे. (Adivasi Women Empowerment)

काय आहे राणी दुर्गावती योजनेचा उद्देश?

'राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण' योजना ही महाराष्ट्रातील आदिवासी महिलांना सर्वांगीण सक्षम करण्यासाठी आखली आहे. (Adivasi Women Empowerment)

या योजनेतून शिक्षण, कौशल्यविकास, आरोग्य व पोषण, आर्थिक स्वावलंबन, शासकीय योजनांचा लाभ, बचतगटांचे बळकटीकरण यावर भर दिला आहे.

योजना कोणासाठी?

लाभार्थी: महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीतील महिलांना.

अर्जदाराची अट: अर्जदार स्त्री असावी.

या योजनेअंतर्गत महिलांना वैयक्तिक आणि सामूहिक व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य मिळेल.

वैयक्तिक योजनांसाठी सुविधा

वैयक्तिक व्यवसायासाठी ५० हजार रुपयांपर्यंत १००% अर्थसाहाय्य

यात शाळा-शिक्षण, कौशल्य विकास, आरोग्य व पोषण, बचतगटांचे बळकटीकरण यांसह अनेक बाबींचा समावेश

वैयक्तिक व्यवसाय कोणते?

शिवणकाम यंत्र

भाजीपाला गाडी

ब्युटी पार्लर

पत्रावळी बनवणारी यंत्रणा

सामूहिक योजनांसाठी सुविधा

आदिवासी महिलांनी एकत्र येऊन सामूहिक व्यवसाय उभारल्यास सरकारकडून ७.५ लाख रुपयांपर्यंत अर्थसाहाय्य

सामूहिक व्यवसाय कोणते?

मसाला कांडप यंत्र

आटा चक्की

दुग्ध संकलन केंद्र

शुद्ध पेयजल विक्री केंद्र

बेकरी उत्पादन युनिट

नाश्ता केंद्र

इतर योजनांसोबत एकत्रित लाभ

राणी दुर्गावती योजना इतर सरकारी योजना (महिला व बालकल्याण, कृषी, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय) सोबत लाभ घेता येणार आहे.

उदाहरणार्थ 

रुग्णालय रिक्षा (गुलाबी सुरक्षा योजना)

शेळी/मेंढी वाटप योजना

दुग्ध व्यवसायासाठी जनावरे

स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शिका

एकात्मिक कुक्कुट विकास योजना

कृषी सिंचन उपकरणे व सौरपंप

मासेमारी साधने खरेदी

अर्ज प्रक्रिया

अर्ज आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्प कार्यालयात करता येईल

वैयक्तिक योजनेसाठी जात प्रमाणपत्र आवश्यक

सामूहिक योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे अनिवार्य

वैयक्तिक योजनेसाठी कागदपत्रे

जात प्रमाणपत्र (Caste Certificate) – अर्जदार आदिवासी महिला असल्याचे प्रमाणपत्र.

ओळखपत्र (Identity Proof) – आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र आदी.

पत्ता प्रमाणपत्र (Address Proof) – आधार कार्ड, वीज बिल, बँक स्टेटमेंट आदी.

बँक खाते माहिती – आर्थिक सहाय्यासाठी बँक खाते तपशील आवश्यक.

व्यवसायाची माहिती / योजना सादरीकरण – अर्ज करताना व्यवसायाची संकल्पना, खर्च अंदाज व अपेक्षित लाभ याचा तपशील.

सामूहिक योजनांसाठी (Group/SHG) कागदपत्रे

जात प्रमाणपत्र – प्रत्येक सदस्यासाठी किंवा गटाच्या प्रतिनिधीसाठी.

गटाची नोंदणी कागदपत्रे (SHG / Cooperative Registration)

बँक खाते माहिती (Group Bank Account) – आर्थिक सहाय्यासाठी.

व्यवसाय प्रस्ताव / व्यवसाय योजना – सामूहिक व्यवसायाचा तपशील, खर्च अंदाज, अपेक्षित उत्पन्न.

सदस्यांची यादी (List of Members) – नाव, वय, पत्ता, ओळखपत्र क्रमांक.

योजना का महत्वाची आहे?

आदिवासी महिलांचे जीवनमान उंचावणे

आर्थिक स्वावलंबन निर्माण करणे

कौशल्य विकास व सामाजिक सशक्तीकरण

या योजनेमुळे आदिवासी महिलांना स्वयंपूर्ण आर्थिक आणि सामाजिक स्वावलंबनाचा मार्ग खुला होईल आणि त्यांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा होईल.

हे ही वाचा सविस्तर : Wild Animal Attack : वन्यप्राण्यांचा हल्ला; शेतकऱ्यांना मिळणार १ कोटींचा आधार वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीमहिला