नाशिक : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळवण कार्यक्षेत्रातील सटाणा, मालेगाव व नांदगाव या तालुक्यांसाठी जिल्हा वार्षिक योजना सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात विविध योजना मंजूर आहेत.
त्या अनुषंगाने अनुसूचित पारधी जमातीच्या नागरिकांनी २३ मार्च २०२६ पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज प्रकल्प कार्यालय, कळवण येथे सादर करावेत. असे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदवासी विकास प्रकल्प कळवणचे प्रकल्प अधिकारी डॉ.कश्मिरा संखे यांनी केले आहे.
विहित नमुन्यातील अर्ज २३ फेब्रुवारी ते १० मार्च २०२६ या कालावधीत सटाणा, मालेगाव व नांदगाव तालुक्यातील गट विकास अधिकारी कार्यालयात शासकीय सुटी वगळून इतर दिवशी उपलब्ध होतील.
अशा आहेत योजना
- अनुसूचित पारधी जमातीच्या महिला/ पुरूषांना किराणा दुकान व्यवसायासाठी १०० टक्के अनुदानावर साहित्य खरेदीसाठी अर्थसहाय्य करणे, अथवा पुरवठा करणे.
- अनुसूचित पारधी जमातीच्या महिला/ पुरूषांना पीठ गिरणी व्यवसायासाठी १०० टक्के अनुदानावर साहित्य खरेदीसाठी अर्थसहाय्य करणे, अथवा पुरवठा करणे.
- अनुसूचित पारधी जमातीच्या महिला/ पुरूषांना रसवंती व्यवसायासाठी १०० टक्के अनुदानावर साहित्य खरेदीसाठी अर्थसहाय्य करणे, अथवा पुरवठा करणे.
- अनुसूचित पारधी जमातीच्या बेरोजगार युवकांना उत्पन्न वाढीसाठी इलेक्ट्रिक दुकानासाठी १०० टक्के अनुदानावर साहित्य खरेदीसाठी अर्थसहाय्य करणे, अथवा पुरवठा करणे.
- अनुसूचित पारधी जमातीच्या बेरोजगार युवकांना उत्पन्न वाढीसाठी व्यवसायासाठी १०० टक्के अनुदानावर साहित्य खरेदीसाठी अर्थसहाय्य करणे, अथवा पुरवठा करणे.
- अनुसूचित पारधी जमातीच्या बेरोजगार युवतींना उत्पन्न वाढीसाठी कटलरी व ब्युटीपार्लर व्यवसायासाठी १०० टक्के अनुदानावर साहित्य खरेदीसाठी अर्थसहाय्य करणे, अथवा पुरवठा करणे.
वरील मंजूर योजनांसाठी सटाणा, मालेगाव व नांदगाव तालुक्यातील इच्छुक अनुसूचित जमातीचे नागरिक अर्ज करू शकतात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्जदार अनुसूचित जमातीचा असावा. अर्जासोबत जातीचा दाखला, आधार कार्ड, रेशन कार्ड, अर्जदाराचे राष्ट्रीयीकृत बँक खाते, पासबुक झेरॉक्स, उत्पन्नाचा दाखला (अलिकडील १ वर्षाच्या आतील), बीपीएल दाखला, अंपग, विधवा, परितक्त्या प्रमाणपत्र (असल्यास), मतदान कार्ड, पॅन कार्ड, अलिकडच्या काळातील २ सुस्पष्ट पासपोर्ट आकारातील छायाचित्र व यापूर्वी सदर योजनेचा लाभ या कार्यालयाकडून अथवा अन्य कार्यालयाकडून घेतला नसल्याचे स्वयंघोषणापत्रस्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे, असेही सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. संखे यांनी कळविले आहे.
Web Summary : Nashik's tribal communities can avail 100% grants for businesses like grocery stores, flour mills, and juice centers. Applications are open until March 23, 2026, at the Kalwan project office. Required documents include caste certificate, Aadhar card, and income proof.
Web Summary : नाशिक के आदिवासी समुदाय किराना, आटा चक्की और जूस सेंटर जैसे व्यवसायों के लिए 100% अनुदान का लाभ उठा सकते हैं। आवेदन 23 मार्च, 2026 तक कलवान परियोजना कार्यालय में खुले हैं। आवश्यक दस्तावेजों में जाति प्रमाण पत्र, आधार कार्ड और आय प्रमाण शामिल हैं।