Join us

तुमचे आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक आहे का? हे ऑनलाईन कसे चेक कराल? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 12:02 IST

Pan Aadhaar Link Online 2025 सर्व पॅन कार्डधारकांनी आपला पॅन क्रमांक आधार क्रमांकाशी जोडणे अनिवार्य आहे. निर्धारित मुदतीपर्यंत हे न केल्यास तुमचे पॅनकार्ड निष्क्रिय होईल.

सर्व पॅन कार्डधारकांनी आपला पॅन क्रमांक आधार क्रमांकाशी जोडणे अनिवार्य आहे. निर्धारित मुदतीपर्यंत हे न केल्यास तुमचे पॅनकार्ड निष्क्रिय होईल.

पॅनकार्ड निष्क्रिय झाले तर त्याचा थेट परिणाम दैनंदिन आर्थिक व्यवहारांवर होणार आहे, असा इशारा केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) दिला आहे.

पॅन कार्ड निष्क्रिय झाल्यास काय होईल?◼️ बँक खाते किंवा डिमॅट खाते उघडता येणार नाही.◼️ ५०,००० पेक्षा जास्त रोख ठेवी करता येणार नाही.◼️ गुंतवणूक, एसआयपी सुरू करणे, ट्रेडिंग करणे अशक्य.◼️ सरकारी आर्थिक कल्याण योजनांचा लाभ मिळणार नाही.◼️ कर्जाचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.◼️ घर, वाहन खरेदी-विक्री करता येणार नाही.◼️ बिलिंग किंवा कर भरण्याचे सर्व कामकाज थांबेल.◼️ परकीय चलन व्यवहार पॅनशिवाय करता येणार नाहीत.

लिंक करण्याची सोपी पद्धत◼️ https://www.incometax.gov.in/iec/foportal या इन्कम टॅक्स ई-फायलिंग पोर्टलला भेट द्या.◼️ स्क्रीनवरील डाव्या बाजूच्या मेन्यूमधून 'लिंक आधार स्टेटस' टॅबवर क्लिक करा.◼️ तुमचा पॅन आणि आधार क्रमांक टाकत 'व्हिव लिंक आधार स्टेटस' बटण दाबा.◼️ तुम्हाला तुमचे लिंक आधार स्टेटस दिसेल.

तुमचे आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक नसेल तर ते ऑनलाईन लिंक करण्यासाठी खालील पद्धतीने ते तुम्हाला लिंक करता येईल.

लिंक करण्याची सोपी पद्धत◼️ https://www.incometax.gov.in/iec/foportal या इन्कम टॅक्स ई-फायलिंग पोर्टलला भेट द्या.◼️ स्क्रीनवरील डाव्या बाजूच्या मेन्यूमधून 'लिंक आधार' टॅबवर क्लिक करा.◼️ तुमचा पॅन आणि आधार क्रमांक टाकत व्हॅलिडेट बटण दाबा.◼️ मोबाइलवर ओटीपी येईल.◼️ ओटीपी टाकल्यानंतर प्रक्रिया पूर्ण होईल आणि पॅन-आधार लिंक होईल.

अधिक वाचा: ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या पगाराचा मार्ग मोकळा; कर वसुलीची अट शिथिल, आता किती वेतन मिळणार?

English
हिंदी सारांश
Web Title : Check if your Aadhaar is linked to PAN online easily.

Web Summary : Linking Aadhaar with PAN is mandatory. Unlinked PAN cards will become inactive, impacting financial transactions, investments, and access to government schemes. Check status or link through the income tax e-filing portal.
टॅग्स :पॅन कार्डआधार कार्डइन्कम टॅक्सऑनलाइनमोबाइल