Join us
Daily Top 2Weekly Top 5

तूरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचे कसे कराल व्यवस्थापन वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 10:59 IST

Pod Borer मागील आठवड्यातील असणारे रात्रीचे थंड हवामान तूर पिकावरील शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या वाढीस पोषक आहे व यामुळे तूर पिकाला शेंगा पोखरणाऱ्या अळ्यापासुन नुकसान होण्याची शक्यता आहे.

सध्या तूर पिक हे फुलोऱ्यावर आहे व काही ठिकाणी शेंगा लागण्यास सुरुवात झालेली आहे. मात्र मागील आठवड्यातील असणारे रात्रीचे थंड हवामान तूर पिकावरील शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या वाढीस पोषक आहे व यामुळे तूर पिकाला शेंगा पोखरणाऱ्या अळ्यापासुन नुकसान होण्याची शक्यता आहे.

तरी शेतकरी बंधूनी आपल्या पिकाची पाहणी करून वेळीच व्यवस्थापनाचे उपाय योजना करणे आवशक आहे. शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांमध्ये खालील प्रकारच्या अळ्यांचा समावेश होतो.

१) शेंगा पोखरणारी अळी (हेलीकोवर्पा)या किडीची मादी पतंग तुरीच्या कळ्या, फुले व शेंगा, यावर अंडी घालते. अंड्यातून निघालेल्या अळ्या तूरीच्या कळ्या आणि फुले खाऊन नुकसान करतात.पूर्ण वाढ झालेली अळी ३० ते ४० मि.मि. लांब, विविध रंग छटेत दिसुन येते जसे पोपटी, फिक्कट गुलाबी व करड्या रंगाची असून तीच्या पाठीवर तुटक करड्या रेषा असतात.मोठ्या अळ्या शेंगांना छिद्र करून आतील दाणे पोखरून शेंगा पोखरणारी अळी खातात.

२) पिसारी पतंगया पतंगाची अळी १२.५ मि.मि. लांब हिरवट तपकिरी रंगाची असते. तिच्या अंगावर सुक्ष्म काटे व केस असतात. अळी शेंगावरील साल खरडून छिद्र करते. व बाहेर राहून दाने पोखरते.

३) शेंग माशीया माशीची अळी बारीक गुळगुळीत व पांढऱ्या रंगाची असून तिला पाय नसतात. तोंडाकडील भाग निमुळता व टोकदार असतो. ही अळी शेंगाच्या आत राहून शेंगातील दाने अर्धवट कुरतडून खाते व त्यामुळे दाण्याची मुकनी होते.

एकात्मिक व्यवस्थापणया तिनही किडी कळ्या, फुले व शेंगावर आक्रमण करीत असल्यामुळे त्यांच्या व्यवस्थापनाकरीता जवळ जवळ सारखेच उपाय योजावे लागतात.१) प्रति हेक्टर २० पक्षीथांबे शेतात उभारावेत. त्यामुळे पक्षी किडींच्या अळ्या खाऊन फस्त करतात. तसेच घाटे अळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी २० कामगंध सापळे लावावेत.२) आर्थिक नुकसानीची पातळी• घाटे अळी ५-६ पतंग प्रती सापळा २-३ दिवसात किंवा १ अळी प्रती झाड किंवा ५-१० टक्के नुकसान.• पिसारी पतंग ५ अळ्या/१० झाडे अशी आर्थिक नुकसान थोक्याची पातळी गाठताच खालील उपाययोजना कराव्या.• शेंग माशी ५ ते १० टक्के नुकसान ग्रस्त दाणे.३) पहिली फवारणी (५० टक्के फुलोरावर असतांना)निंबोळी अर्क ५ टक्के किंवा अझाडिरेक्टीन ३०० पीपीएम ५० मिली किंवा अझाडिरेक्टीन १५०० पीपीएम २५ मिली किंवा बॉसिलस थुरिंनजिएसिस १५ मिली किंवा क्विनॉलफॉस २५ ई.सी., २० मि.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.४) दुसरी फवारणी (पहिल्या फवारणीनंतर १५ दिवसानी)इमामेक्टीन बेझोएट ५ एस जी ३० ग्रॅम किंवा लॅब्डा सायहॅलोमेथ्रीन ५ टक्के ईसी १० मिली किंवा ईथिऑन ५० टक्के ईसी २५ मिली किंवा क्लोरॅनट्रॅनीलिप्रोल १८.५ टक्के एस.सी. प्रवाही २.५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

अधिक वाचा: Rabi Sowing : पेरणीसाठी घरचे बियाणे वापरताय मग अशी करा उगवण क्षमता चाचणी

टॅग्स :तूरकीड व रोग नियंत्रणपीकशेतीशेतकरी