Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन पिकावरील पाने खाणाऱ्या किडींचे व्यवस्थापन कसे कराल? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 14:40 IST

Soyabean Farming : सोयाबीन पिक हिरवेगार, मऊ, लुसलुशीत आणि दाट पानांचे असल्यामुळे अनेक पाने खाणाऱ्या किडी या पिकाकडे आकर्षित होतात. 

Soyabean Farming : सोयाबीनचे पिक मध्यस्थितीत फुलोऱ्याच्या तसेच शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे. या अवस्थेत सोयाबीन पिक हिरवेगार, मऊ, लुसलुशीत आणि दाट पानांचे असल्यामुळे अनेक पाने खाणाऱ्या किडी या पिकाकडे आकर्षित होतात. 

त्यात प्रामुख्याने तंबाखूवरील पाने खाणारी अळी (स्पोडोप्टेरा), उंट अळी, पाने गुंडाळणारी अळी, केसाळ अळी व शेंगा पोखरणारी अळी (निकोव्हो वा पाने खाणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसुन येतो.

एकात्मिक कीड व्यवस्थापन

मशागतीसाठी उपाय

  • पिकाच्या सुरवातीच्या अवस्थेत पिक तणमुक्त ठेवावे. 
  • बांधावर असणाऱ्या किडीच्या पर्यायी यजमान वनस्पतीचा नाश करावा.
  • मुख्य पिकाभोवती एरंडी आणि सूर्यफूल या सापळा पिकाची एक ओळ लावावी. 
  • त्यावर तंबाखूवरील पाने खाणारी अळी, उंट अळी व केसाळ अळीने प्रादुर्भाग्रस्त पाने आढळल्यास अशी पाने अळयांसहित नष्ट करावीत.
  • उशिरा पेरणी केल्यास या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आदळून येण्याची शक्यता असते. 

यांत्रिक उपाय 

  • शेतात अगदी सुरवातीला किड व रोगग्रस्त झाडे दिसताच उपटुन नष्ट करावीत.
  • तंबाखूवरील पाने खाणारी अळी व केसाळ अळी एकाच पानावर कुंजक्याने अंडी घालते. 
  • त्यातुन बाहेर पडणाऱ्या अळ्या सुरवातीला एकाच पानावर बहुसंख्य असतात. अशी अंडी व अळीग्रस्त पाने अलगद तावुन किडींसह नष्ट करावीत. 
  • शेंगा पोखरणारी अळी व तंबाखूवरील पाने खाणारी अळी या किडीच्या प्रादुर्भावाची पातळी समजण्यासाठी एका हेक्टरवर प्रत्येकी पाच
  • कामगंध सापळे लावावेत. 

जैविक उपायसुरवातीस निंबोळी अर्क (५ टक्के) किंवा अझाडिरॅक्टिन १००० पीपीएम २० ते ३० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. मेंटारालम रीलाई व विव्हरिया बँमियाना (१.१५ विद्राव्य पावडर) या बुरशीजन्य जैविक किटकनाशकाची ५० पैम प्रति १० लिटर सुरवातीला पाण्यात मिसळून फवारणी करावी. 

जॅसिलम थुरीजेन्सीस प्रजाती कुर्ताकी या विषाणूजन्य जैविक किटकनाशकाची १०-१५ ग्रॅम /मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तंबाखूवरील पाने खाणारी अळी (म्पोडोप्टेरा) व शेंगा पोखरणारी अळी (हेलिकोवर्पा) यांच्या व्यवस्थापनामाठी अनुक्रमे एम.एल.एन.पी.व्ही. (५०० एल.ई) व एच. ए. एन.पी.व्ही. (५०० एम.ई.) या विषाणुजन्य किटकनाशकाची १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिमळून फवारणी करावी. 

रासायनिक उपायपाने खाणाऱ्या किडींची आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडताच रासायनिक किटकनाशकाची फवारणी करावी. दूसरी फवारणी १० ते १५ दिवसांच्या अंतराने करावी एकच किटकनाशक न वापरता ते आलटून पालटून वापरावे. 

- विशाल चौधरी, विषय विशेषज्ञ, पिकसंरक्षण कृषि विज्ञान केंद्र, मालेगाव  

टॅग्स :सोयाबीनशेती क्षेत्रपीक व्यवस्थापनशेती