Join us

तुम्ही खात असलेल्या आंब्यांपासून कशी तयार कराल रोपे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 3:53 PM

पुढच्या हंगामात हवाय घरचा आंबा; मग या वर्षीच्या पावसाळ्यात लावा एक तरी आंबा

फळांचा राजा म्हणून आंब्याला ओळखले जाते. उन्हाळ्यात वेगवेगळ्या प्रजातींचे आंबे सध्या मोठ्या प्रमाणात बाजारात मिळत आहे. आंबे खाण्याची मजा काही औरच असते. ज्या आवडीने आपण आंबे खातो, त्याच आवडीने आपण आंब्यांची वृक्ष लागवड करण्याचा प्रयत्न केल्यास पर्यावरण संरक्षणासाठी मोठा हातभार लागू शकतो. आपण घरच्या घरी आंब्याची रोपे तयार करून सहज लागवड करू शकतो.

आंब्याची लागवड कशी करावी?

आंबे खाणार आहात तर त्यांच्या कोया कोरड्या मातीत बुडवून ठेवा. म्हणजे कोयीचा ओलावा शोषला जाईल, कोय सावलीत वाळवा, आठ दिवसांनंतर कोय उगवण्यास पात्र होईल.

आंबे कुठे लावायचे ?

आपल्याकडील दुधाच्या पिशव्यांना पंचिंग करून त्यात माती भरून कोयी पूर्णपणे मातीत गाडा. त्या पिशव्या सावलीत ठेवा, रोज पाणी घाला, १५ दिवसांत अंकूर येईल हवी तेवढी रोपे तयार करा, पाऊस सुरू झाला की कुठेतरी लावता येईल किंवा कुणाला तरी देण्यास सोयीचे होईल.

वृक्ष लागवडीबाबत होईल अभ्यास

या प्रयोगाद्वारे घरातील मुलांनाही बी कशी उगवते, कोंब कसा येतो, त्याचे पान, कळी, फूल, फळ कसे तयार होते याचे घरबसल्या निरीक्षण करता येईल. ज्यातून मुलांचा अभ्यास होण्यास मदत होईल.

तसेच आम्रवृक्षांचे असलेले १५० ते २०० वर्षांचे आयुष्य, १२ महिने हिरवेगार असलेली सावली, अशी माहिती देखील मुलांना देऊन आपण त्यांना वृक्ष जोपासण्यास प्रोत्साहन देऊ शकतो. 

वृक्ष संर्वधनास लागणार हातभार

रोपे घरच्या घरीच तयार व्हावीत. सर्वत्र आमराया दिसाव्यात, असे आपण बरेचदा बोलतो. मात्र, त्यासाठी कधीच पुढाकार घेत नाही. मात्र, आता आपण आंबे खाल्ल्यानंतर त्याची लागवड केली तर आपला थोडासा का होईना पण वृक्ष संवर्धनास हातभार लागणार आहे हे नक्की.

हेही वाचा - टरबूज खाणे फायदेशीर; पण ते केमिकल द्वारे पिकविलेले असेल तर?

टॅग्स :आंबाफळेशिक्षणइनडोअर प्लाण्ट्स