Join us

कृषी विद्यापीठातर्फे बनपिंपळा येथे ड्रोन फवारणीचे प्रात्‍यक्षिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2023 14:38 IST

या प्रात्यक्षिकासाठी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या वतीने दिनांक १३ ऑगस्‍ट रोजी मौजे बनपिंपळा येथील आ. रत्‍नाकर गुट्टे यांच्‍या शेतात ड्रोनव्‍दारे फवारणीचे प्रात्‍यक्षिक दाखविण्‍यात आले. 

यावेळी आ. रत्‍नाकर गुट्टे, कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि, युवा उद्योजक श्री सुनीलजी गुट्टे, गंगाखेड शुगरचे मुख्‍याधिकारी राजेंद्र डोंगरे, श्री प्रल्‍हादराव मुरकुटे, श्री संदीप आळनुरे, श्री हनुमंत मुंडे, रामप्रसाद सातपुते, श्री बालासाहेब लटपटे, सरपंच श्री गोविद सानप, श्री स्‍वप्निल मुंडे, आदीसह शेतकरी बांधव मोठया संख्‍येने उपस्थित होते.

 यावेळी कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी विद्यापीठात सुरू असलेल्‍या आधुनिक तंत्रज्ञान व डिजिटल तंत्रज्ञान यावरील संशोधनाची माहिती दिली. 

टॅग्स :शेतीशेतकरीलागवड, मशागत