Join us

डाळिंब पिकातील ह्या रोगावर करा वेळीच नियंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 4:28 PM

डाळिंब पिकावरील मर रोग एक महत्त्वाचा रोग असून त्याचा प्रादुर्भाव महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येतो.

डाळिंब पिकावरील मर रोग एक महत्त्वाचा रोग असून त्याचा प्रादुर्भाव महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. या बुरशीजन्य मर रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने सेरॅटोसिस्टीस फिम्ब्रीआटा, फ्युझरीयम सोलानी, फ्युझरीयम ऑक्सीस्पोरम, मॅक्रोफोमिना व रायझॉक्टोनिया बटाटीकोला या बुरशीमुळे झालेला आढळून येतो.

डाळिंबावरील बुरशीजन्य मर रोग नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनाया रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्यास तो कोणत्याही प्रकारच्या उपचारांना प्रतिसाद देत नसल्यामुळे प्रतिबंधात्मक उपचार महत्वाचे ठरतात.१) डाळिंब बागेसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी हलकी ते मध्यम प्रतीची चुनखडी मुक्त जमीन निवडावी.२) लागवड करण्यापुर्वी जमीन प्रखर सुर्यप्रकाशाने तापवून घ्यावी.३) रोगविरहीत बागांमधील गुटीपासून तयार केलेले रोपे लागवडीसाठी वापरावी.४) डाळिंब लागवड ४.५x३.० मी. अंतरावर करावी. त्यापेक्षा कमी अंतरावर करु नये.५) खड्डे उन्हाळ्यात लागवडीच्या कमीत कमी एक महिना अगोदर घेऊन उन्हात तापू द्यावेत. यामुळे काहि प्रमाणात निर्जंतूकिकरणास मदत होते६) खड्डे भरतांना जर भारी माती असेल तर वाळू आणि माती १:१ या प्रमाणात घेउन त्यामध्ये शेणखत २० किलो, गांडुळखत २ किलो, निंबोळी पेंड ३ किलो, ट्रायकोडर्मा प्लस २५ ग्रॅम, अॅझोटोबॅक्टर १५ ग्रॅम व स्फुरद जिवाणू १५ ग्रॅम टाकावे.

पाणी व्यवस्थापनाचे योग्य नियोजन१) पाणी व्यवस्थापन त्या ठिकाणच्या बाष्पीभवनाचा दर लक्षात ठेऊन करावे.२) पाणी पुरवठा जमिनीच्या मगदुराप्रमाणे करणे आवश्यक आहे.३) ठिबक सिंचन संचाद्वारे पाणी पुरवठा करीत असतांना दररोज किंवा एक दिवसाआड संच न चालवता जमिनीत वाफसा आल्यानंतर संच चालविणे योग्य आहे.४) झाडांना शिफारस केलेल्या मात्रेनुसार पाणी द्यावे.५. झाडाचा पसारा मोठा असल्यास दोन ऐवजी चार ड्रिपरचा वापर करावा.६) ड्रिपर झाडाच्या पसा-याच्या ६ इंच बाहेर असावेत.७) ड्रिपरमधुन योग्य त्या प्रमाणात पाणी पडते किंवा नाही याची खात्री करावी.८) पाण्यात बचत करण्याच्या दृष्टीने सेंद्रिय आच्छादनाचा वापर करावा.

डाळिंबावरील बुरशीजन्य मर रोग आल्यानंतर करावयाची उपाययोजना१) मर रोगाची लक्षणे दिसता क्षणीच लागण झालेले झाड आणि निरोगी झाड यामध्ये तीन ते चार फूट लांबीचा चर खोदल्यास त्याचा इतरत्र होणारा प्रसार रोखण्यास मदत होते.२) मर रोगाच्या प्रादुर्भावाने संपुर्णतः मेलेली झाडे खोदून काढून मुळे वा मुळावरील माती इतरत्र कोठेही पडू न देण्यासाठी कापडाने/पॉलिथीनने झाकून बागेबाहेर नेउन जाळून टाकावीत. खड्डा निर्जंतुक करावा व नंतरच त्या खड्डयामध्ये लागवड करावी.३) बागेमध्ये मर रोगाची प्राथमिक अवस्थांमधील लक्षणे दिसून आल्यास ताबडतोब वरीलप्रमाणे बुरशीनाशकांची ५-१० लिटर द्रावणाची झाडाच्या सभोवतालच्या निरोगी झाडासहीत भिजवन करावी. अशाप्रकारे ३-४ वेळेस २० दिवसांच्या अंतराने भिजवन करावी.

अधिक वाचा: oily spot डाळिंबावरील तेल्या रोगाची लक्षणे आणि व्यवस्थापन

टॅग्स :डाळिंबफळेपीकशेतकरीशेतीफलोत्पादनकीड व रोग नियंत्रण