Join us

सामायिक क्षेत्र असलेल्या शेतजमिनीतील हिस्सा विकता येतो का? काय आहे कायदा? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 17:53 IST

Samaik Jamin Vikri जर तुमची मालमत्ता/शेतजमीन सामायिक आहे. आणि त्यातील हिस्सा विकायचा असेल तर तो विकता येईल का? काय आहे नियम सविस्तर जाणून घेऊया.

जेव्हा एखादी मालमत्ता सामायिक असते किंवा त्या मालमत्तेवर एकापेक्षा जास्त लोकांची नावे असतात, त्यावेळी काही कायदेशीर प्रश्न निर्माण होतात.

काही वेळा ही मालमत्ता एकाच कुटुंबातील व्यक्तींची असते, तर काही वेळा त्यात इतर व्यक्तीही असतात. यासंदर्भात वेगवेगळ्या शक्यता निर्माण होतात.

समजा एखाद्या सामायिक मालमत्तेतील तुमचा हिस्सा तुम्हाला विकायचा आहे, पण त्याचवेळी इतरांनाही त्यांचा हिस्सा विकायचा आहे.

म्हणजेच त्या मालमत्तेचे मालक असलेल्या सगळ्यांनाच आपला हिस्सा विकायचा असेल किंवा त्याची एकत्रित विक्री करायची असेल तर कोणत्याही कायदेशीर अडचणींशिवाय ते ही मालमत्ता विकू शकतात आणि त्याची विल्हेवाट लावणेही सोपे जाते.

मात्र, इतर सहहिस्सेदार किंवा त्यातील काही सहहिस्सेदार आपला हिस्सा विकायला तयार नसतील तर मात्र काही कायदेशीर गोष्टी उद्भवतात.

कारण मालमत्तेवर 'सामायिक' हक्क असल्यानं कोणाचा हिस्सा किती हे निश्चत सांगता येत नाही. त्याचं सरस-निरस वाटप झालेलं नसतं.

सहहिस्सेदाराकडूनच त्याचा हिस्सा विकत घ्यायचा असेल तर समान अविभाजित हक्क आणि हिस्सा असा उल्लेख खरेदीखतात करावा लागतो.

आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सामायिक मालमत्तेतील आपला हिस्सा एखाद्याला विकायचा असेल तर तो विकत घेण्याचा प्राधान्याचा हक्क/पहिली संधी बाकीच्या सहहिस्सेदारांना असते.

सहहिस्सेदार कुटुंबातला नसल्यास त्यानं आधी आपला हिस्सा वेगळा करून घेणं श्रेयस्कर असतं. त्यासाठी वाटपाचा दावा दाखल करून आपला हिस्सा स्वतंत्र करून घ्यावा.

अधिक वाचा: सामायिक शेतजमिनीची वाटणी करता येते का? काय आहे नियम? जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :शेतीशेतकरीमहसूल विभागराज्य सरकारसरकार