Join us

साठवणुकीत कापूस अधिक काळ टिकण्यासाठी महत्वाच्या १० टिप्स; वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 17:51 IST

Kapus Sathavnuk कापूस प्रतवारीच्या दृष्टीने कापसाची वेचणी व साठवणूक करताना काळजी घेणे गरजेचे असते. कापसाला मिळणारा बाजारभाव हा सर्वस्वी कापसाच्या प्रतीवर अवलंबून असतो.

कापूस प्रतवारीच्या दृष्टीने कापसाची वेचणी व साठवणूक करताना काळजी घेणे गरजेचे असते. कापसाला मिळणारा बाजारभाव हा सर्वस्वी कापसाच्या प्रतीवर अवलंबून असतो.

कापसाची प्रत राखण्याकरिता वेचणी करताना काळजी घेणे आवश्यक आहे. वेचणी सुरू झाल्यापासून साधारणतः ३ ते ४ वेचणीत बराचसा कापूस गोळा होतो. आपल्याकडे वेचणी करताना काळजी न घेतल्यामुळे ३० ते ३५ टक्के पालापाचोळा व इतर केरकचरा रूईमध्ये आढळतो.

कापसाची योग्य प्रकारे साठवण कशी करावी?१) प्रत्येक वेचणीनंतर कापूस सावलीत वाळवून नंतरच साठवावा.२) कोरडवाहू कपाशीच्या पहिल्या तीन वेचण्यांचा तसेच बागायती कपाशीच्या मधल्या चार वेचणींचा कापूस दर्जेदार असतो. हा कापूस शक्यतोवर वेगळा साठवावा.३) वेचणीच्या काळात पाऊस पडल्यास पावसाने भिजलेला कापूस झाडावर सुकू घावा व पूर्ण वाळल्यानंतरच वेचणी करून वेगळा साठवावा.४) शेवटच्या वेचणीचा कापूस कवडीयुक्त व किडका असतो. या कापसाला झोडा असे संबोधले जाते. अशा कापसाची रूई व धागा हा निकृष्ट दर्जाचा असतो. म्हणून असा कापूस वेगळा साठवावा.५) कपाशीवर रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव जास्त असल्यास हा चिकट स्त्राव पानांवरून कापसावर पडतो व रूईची प्रत खालावते. परिणामतः बाजारभाव कमी मिळतो तसेच अशा प्रकारच्या रूईला मागणी नसते. त्यामुळे या कापसाची सुध्दा साठवण वेगळी करावी. ६) कापसाच्या गंजीत केरकचरा किंवा धुळीचे कण मिसळणार नाहीत याची काळजी घ्यावी.७) पूर्णपणे कोरड्या कापसाची वेचणी करून तो कोरड्या ठिकाणी साठवून ठेवावा उघड्या अंगणात साठविला असल्यास त्वरित झाकून ठेवावा.८) डागाळलेला व किडींमुळे रंग बदललेला कापूस वेगळा साठवावा. हा डागाळलेला कापूस चांगल्या कापसात मिसळू नये, त्यामुळे चांगल्या कापसाची प्रत कमी होऊ शकते.९) कापूस मोकळी हवा असलेल्या पक्क्या गोदामात साठवावा. ओलसर जागेत साठवणूक केल्यास त्या कापसास पिवळसरपणा येतो. त्यामुळे रूई आणि धाग्याची प्रत खालावते.१०) निरनिराळ्या कापूस वाणांची साठवण वेगवेगळ्या ठिकाणी करावी जेणेकरून त्याची सरमिसळ किंवा भेसळ होणार नाही.

अधिक वाचा: Amba Falgal : आंबा पिकातील फळगळ रोखण्यासाठी करा हे सोपे उपाय

टॅग्स :कापूसबाजारशेतकरीशेतीकाढणीपीककीड व रोग नियंत्रण