Join us

Wheat Market: नव्या गव्हाची बाजारात आवक सुरु; जाणून घ्या सध्याचा क्विंटलचा भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 18:05 IST

Wheat Market: नव्या गव्हाची आवक आता बाजारात सुरु झाली. त्यामुळे सध्या गव्हाला बाजारात काय दर मिळत आहेत. ते जाणून घ्या सविस्तर

Wheat Market : वाशिम जिल्ह्यात गहू काढणीचा हंगाम जोरात सुरू असून, यंदा अनुकूल हवामानामुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळाले आहे. गव्हाची बाजारातील आवकही झपाट्याने वाढली आहे.

सोमवारी (२४ फेब्रुवारी) रोजी जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये (market) विक्रमी १५ हजार क्विंटलपेक्षा अधिक गव्हाची आवक (arrival) झाली होती. यंदा गव्हाच्या उत्पादनासाठी आवश्यक असलेली थंडी अधिक काळ टिकल्याने रब्बी हंगाम पिकाच्या फायद्याचा ठरला. परिणामी, गव्हाच्या उत्पादनात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांनी काढणीला वेग दिला असून, बाजारातील चांगल्या दरामुळे गहू विक्रीला प्राधान्य दिले जात आहे. सोमवारी बाजार समित्यांमध्ये (Wheat Market) गव्हाला सरासरी २ हजार ८५० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. त्यामुळे बाजारातील गव्हाची आवक सातत्याने वाढत आहे.

शेतकरी पुढच्या हंगामाची तयारी करीत आहेत. यासाठी पैसा अडका हाती असणे आवश्यक असल्याने शेतमालाची विक्री करावी लागत आहे. तथापि, बाजारात सद्यस्थितीत तूर, सोयाबीन आणि हरभऱ्याला अपेक्षित असे दर मिळत नसल्याने शेतकरी या शेतमालाची विक्री थांबवून गव्हाच्या विक्रीवर भर देत आहेत.

गव्हाला कोठे किती दर?

वाशिम२८७५
कारंजा२९७०
मानोरा२८००
रिसोड२८५०
मं.पीर२९५०

कारंजात ९ हजार क्विंटल आवक

* इतर बाजार समित्यांच्या तुलनेत कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीत गव्हाची सर्वाधिक आवक झाली.

* सोमवारी येथे ९ हजार क्विंटल गहू दाखल झाला असून, त्याला कमाल २,९७० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.

* मोठ्या प्रमाणातील आवक लक्षात घेता मंगळवारी गव्हाचा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

३७,४७२ हेक्टरवर जिल्ह्यात गहू

जिल्ह्यात सरासरी २५ हजार ८२९ हेक्टरवर गहू पेरणी अपेक्षित आहे. प्रत्यक्षात यंदा मुबलक पाणी साठा उपलब्ध असल्याने या पिकाच्या क्षेत्रात वाढ झाली. कृषी विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यात यंदा ३८ हजार ८२९ हेक्टरवर या पिकाची पेरणी झाली आहे.

हे ही वाचा सविस्तर : Food and Herbal Park: फूड-हर्बल पार्क: विदर्भातील शेतकरी होणार समृध्द वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रगहूबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड