Join us

नाफेडच्या कांदा खरेदीचे काय निकष आहेत? जाणून घ्या अंदर की बात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 1:40 PM

कांदा बाजारभावाबद्दल शेतकरी समाधानी नसलू्याचे चित्र दिसतंय. त्यात नाफेडमार्फत १७ कांदा खरेदी केंद्र सुरू झाली असून त्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांची नियुक्ती केलीय. जाणून घेऊ नाफेडची खरेदी प्रक्रिया.

आज गुरूवारी 24 जुलै रोजी सकाळी पिंपळगाव बाजारसमितीत शेतकऱ्यांच्या कांद्याला हजार ते पंधराशे दरम्यान भाव पुकारल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पावित्रा घेतला. नाफेड आणि बाजारसमित्यांमधील खरेदी हे वेगळे विषय असले, तरीही नाफेडच्या कांदा खरेदीचे काय निकष आहेत, ते लोकमत अ‍ॅग्रोने शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींकडून समजावून घेतले.

अशी होते नाफेडची खरेदी प्रक्रिया : 1.नाफेडची कांदा खरेदी शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत होते. या कंपन्या शेतक ºयांचे आणि नाफेडचे प्रतिनिधी म्हणून काम करतात.2. खरेदीसाठी या कंपन्यांकडे कांदा साठवणुकीच्या विशिष्ट क्षमतेच्या गोडाऊनची अट असते.3. शेतकरी कंपन्यांना खरेदी केलेला कांदा सांभाळण्यासाठी नाफेड विशिष्ट शुल्क अदा करते.4. खरेदी केलेला कांदा शेतकरी कंपन्या आपल्या गोडाऊनमध्ये साठवून ठेवतात. व सरकारच्या आवश्यकतेप्रमाणे नाफेडच्या निर्देशानुसार कांदा बाजारात येतो.5. साठवणुकीदरम्यान सुमारे 18 टक्के कांदा हवामान, हाताळणी वगैरे बाबींमुळे खराब झाला, तर ते गृहीत धरण्यात येते. मात्र त्यापेक्षा जास्त कांदा खराब झाला, व अपेक्षित प्रमाणात कांदा नाफेडला परत दिला नाही, तर नाफेड संबंधित शेतकरी उत्पादक कंपनीकडून खरेदी दराच्या पाचपट वसुली करते. किमतीच्या आतापर्यंत काही कंपन्यांना असा जबर दंड भरावा लागला व त्यातून शेतकººयांच्या कंपन्यांसह त्यांचे सभासद असलेल्या शेतकºयांचेही मोठे नुकसान झाले.6. या अनुभवातून शहाणे होऊन चार ते पाच महिने साठवता येईल अशाच दर्जाचा कांदा शेतकरी कंपन्या खरेदी करतात.

नाफेडला कुठल्या दर्जाचा कांदा लागतो?1. भगवा कांदा, म्हणजेच उन्हाळ कांद्याची खरेदी केली जाते, जेणे करून तो साठवता येईल.2. कांद्याचा रंग खूप उडालेला नको.3. डबल पत्तीचा किंवा आवरणाचा कांदा हवा4. डाग पडलेला, आवरण किंवा पत्ती निघालेला, तोंडाच्या बाजूला बोट पूर्ण जाईल अशी पोकळी असलेला कांदा खरेदी केला जात नाही.5. कांद्याचा विशिष्ट आकार असावा, साधारणत: 45 ते 60 मि.मी. व्यासाचा.6. कांद्याला कोजळी (काजळी) आलेली नसावी.7. त्यात ओलाव्याचे प्रमाण खूप नसावे. 

शेतकऱ्यांची तक्रार काय? सध्या शेतकरी उत्पादक कंपन्यांनी कांदा खरेदी केल्यानंतर प्रत्यक्षात त्यांच्या खात्यात नाफेडकडून पैसे यायला ८ ते १० दिवसांचा वेळ लागतेा. त्यानंतर शेतकऱ्यांना कांदा विक्रीचे पैसे मिळतात. थेाडक्यात शेतकऱ्यांना नाफेड कांदा खरेदीचे पैसे पंधरा दिवसांनी मिळतात. समजा खरेदीच्या वेळी दर १५०० रुपये असेल व पंधरा दिवसांनी शेतकऱ्यांना कांद्याचे पैसे देताना हाच दर २५०० असेल, तर ज्या दिवशी पेमेंट कराल, त्या दिवसाचे दर द्या अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असते. त्यातून त्यांच्यात व नाफेडचे प्रतिनिधी असलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये अनेकदा वादाचे प्रसंग घडतात. याशिवाय कांदा पेमेंट उशिरा मिळत असल्याने शेतकरी नाईलाजाने पुन्हा व्यापाऱ्यांकडे कमी भावात कांदा विक्रीला घेऊन जातात.

टॅग्स :कांदाशेतकरीबाजारपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती