Join us

Tur Market: तुरीचे चुकारे देण्यास का होतोय विलंब; जाणून घ्या कारण सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 10:51 IST

Tur Market : राज्यभरात शेतकऱ्यांनी मार्च महिन्यात सव्वा लाख क्विंटल तुरीची 'नाफेड'ला (NAFED) विक्री केली. विक्री केलेल्या तुरीचे तत्काळ चुकारे मिळणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात एप्रिल उजाडल्यानंतर अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसेच गेले नाहीत. यामुळे शेतकरी संभ्रमात आहे.

रूपेश उत्तरवार

संपूर्ण राज्यभरात शेतकऱ्यांनी मार्च महिन्यात सव्वा लाख क्विंटल तुरीची 'नाफेड'ला (NAFED) विक्री केली. विक्री केलेल्या तुरीचे तत्काळ चुकारे मिळणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात एप्रिल उजाडल्यानंतर अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसेच गेले नाहीत. यामुळे शेतकरी संभ्रमात आहे.

'नाफेड'च्या केंद्रावर तुरीची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना पैसे जमा झाल्याचे मेसेज येत आहेत. मात्र, ७, ९ आणि १५ एप्रिलला मेसेज आलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसेच आले नाहीत. यासंदर्भात यंत्रणेने वरिष्ठ कार्यालयाला संपर्क केला. तांत्रिक अडचणी असल्याचे सांगितले जात आहे.

तसा मेसेज आता 'नाफेड'कडून खरेदी केंद्रात पाठविण्यात आला आहे. दरम्यान, तांत्रिक अडचणीमुळे विशिष्ट तारखेला तुरीचे पैसे गोळा झाले, असा मेसेज गेलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे गेले नाही.

आता हे चुकारे किती आणि शेतकरी किती, याची माहिती गोळा केली जात आहे. पुढील चार ते पाच दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे, असे अमरावती विभागीय अधिकारी अमोल राजगुरू यांनी सांगितले.

तुरीचे चुकारे उशिरा मिळाल्याने काय परिणाम?

* शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक अडचणी येतात, कारण त्यांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसे पैसे मिळत नाहीत.

* उत्पादन खर्चासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यास अडचणी येतात.

* पुढील हंगामासाठी आवश्यक असलेल्या खत, बियाणे आणि इतर वस्तू खरेदी करणे कठीण होते.

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update: राज्यात उष्णतेचा अलर्ट; काय आहे कारण वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रतुरातूरबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड