Join us

Tur Market: शासनाच्या आयात धोरणाचा तुरीवर कसा होतोय परिणाम वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 16:20 IST

Tur Market : डाळीच्या दरात वाढ होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने परदेशातून डाळ आयात केल्याने तुरीचे (Tur) दरावर त्याचा परिणाम होताना दिसत आहे. वाचा सविस्तर (Import Policy)

अमरावती : डाळीच्या दरात वाढ होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने परदेशातून डाळ आयात केल्याने तुरीचे (Tur) दर यंदा दबावात असल्याचा आरोप शेतकऱ्यांद्वारा होत आहे. तुरीला ७, ५५० रुपये हमीभाव असताना, ती सात हजारांवर स्थिरावली आहे. (Import Policy)

दरवाढीच्या प्रतीक्षेत शेतकरी तुरीची (Tur) साठवणूक करत असल्याने नाफेडचीही नोंदणी वाढलेली नसल्याचे वास्तव आहे. ग्राहकांची मागणी स्थिर असताना देशांतर्गत झालेले उत्पादन व परदेशातून होणारी आयात यामुळे जास्त पुरवठा होऊन डाळ स्वस्त, तर तुरीचे दर दबावात आल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. (Import Policy)

मागील वर्षी तुरीला आतापर्यंतचा उच्चांकी भाव मिळाल्याने पेरणी क्षेत्रात झालेल्या वाढीने उत्पन्नात वाढ झाली आहे. त्याचा थेट परिणाम तुरीच्या (Tur) दरावर झालेला आहे. यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पावसाने व ढगाळ वातावरणामुळे तुरीचे मोठे नुकसान झाले. (Import Policy)

नाफेड नोंदणीलाही प्रतिसाद नाही

* यावर्षी शासनाने उशिराने नाफेडची नोंदणी सुरू केली. यावर्षी तुरीला ७,५५० रुपये क्विंटल हमीभाव आहे. त्याच वेळी थोड्या फरकाने मार्केटमध्ये भाव व रोख रक्कम मिळत असल्याने शेतकऱ्यांचा फारसा कल नाफेडकडे नाही. त्यामुळे नोंदणी कमी होत आहे.

मागीलवर्षी तुरीला १२ हजारांवर दर मिळाल्याने दरवाढीच्या प्रतीक्षेत शेतकरी तुरीची साठवणूक करत आहेत. प्रत्यक्षात तुरीला ७,५५० रुपये हमीभाव मिळालेला नाही. त्यामुळे उत्पादनखर्चही पदरी पडला नाही.

हे ही वाचा सविस्तर : Market Update: तूर, हळदीच्या दरांत 'इतक्या' हजारांची घसरण; काय आहे कारण वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रतुराशेतकरीशेतीतूर