Join us

Tur Kharedi : तुरीची शासकीय खरेदी; कसा मिळाला प्रतिसाद वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 16:45 IST

Tur Kharedi : शासकीय हमी केंद्रावर तूर खरेदीचा शुभारंभ झाला आहे. या केंद्रावर शेतकऱ्यांचा कसा मिळतोय प्रतिसाद ते वाचा सविस्तर

तूर खरेदीसाठी (Tur Kharedi) शासकीय हमी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. मात्र, अजूनही हमी केंद्राकडे विक्रीसाठी शेतकऱ्यांनी तूरच नेली नाही. याला आता अनके बाबी कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. 

त्यात प्रामुख्याने खुल्या बाजारातील तुरीचे दर आणि शासकीय हमी केंद्रातील तुरीच्या दरामध्ये अधिक अंतर नाही. यातून शासकीय केंद्राकडे जाण्यासाठी शेतकरी उत्सुक नाहीत. (Tur Kharedi)

खुल्या बाजारात ६,५०० ते ७,३०० रुपयांचा दर आहे. शासकीय हमी केंद्रात तुरीला ७,५५० रुपये क्विंटलचा दर आहे. यातही तूर चांगल्या पध्दतीची चाळणी करून खरेदी केली जाते. 

इतर शेतमाल वापस पाठविला जातो. याशिवाय खरेदी झालेल्या शेतमालाचे पैसे कधी मिळणार, हे माहिती नसते. यातून अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करणे टाळले.

यवतमाळ जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना पुढील काळात तुरीचे दर वाढतील, अशी अपेक्षा आहे. यातून अनेक शेतकऱ्यांनी तूर्त बाजारात तूर विक्रीसाठी आणलीच नाही. यामुळे शासकीय हमी केंद्राकडे तूर विक्रीकरिता गेली नाही.

तूर खरेदीसाठी आर्णी केंद्राला मंजुरी देण्यात आली आहे. यासोबत महागाव, पांढरकवडा, दिग्रस, बाभूळगाव, पुसद, पाटण, दारव्हा या केंद्रांवर मार्केटिंग फेडरेशनने मंजुरी दिली आहे. 

मात्र, या केंद्रावर अद्याप शेतकऱ्यांनी तूर विक्रीकरिता आणलीच नाही. काही शेतकऱ्यांनी पावसाळ्यात बी-बियाण्यांची खरेदी करण्यासाठी तूर राखून ठेवली आहे. आंतरपीक असलेली तूर चांगला दर मिळवून देते. म्हणून मोठ्या प्रमाणात लागवड झाली. प्रत्यक्षात तुरीचे दर घसरले आहे.

हे ही वाचा सविस्तर : Tur Bajar Bhav : 'या' बाजार समितीमध्ये तुरीला मिळतोय हमीभाव वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रतुरासरकारी योजनाअमरावतीपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीबाजारमार्केट यार्डसरकार