Join us

Tomato Market: बाजारपेठेत टोमॅटोचे दर गडगडले; जाणून घ्या काय आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 13:48 IST

Tomato Market: राज्यातील बाजारात टोमॉटोचे (Tomato) दर सातत्याने घसरत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दर घसरण्यामागे काय आहे कारण ते जाणून घ्या सविस्तर

बुलढाणा जिल्ह्यासह राज्यात टोमॉटोचे (Tomato) दर सातत्याने घसरत असून, सध्या १० रुपयांत दीड किलोप्रमाणे टोमॉटोची विक्री होत आहे. मागील दोन महिन्यांपासून दरात घसरण सुरूच असून, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. (Tomato Market)

बाजारात गेल्या काही दिवसांपासून भाजीपाल्यांचे दर घसरले आहेत. टोमॉटोची १० रुपयांत दीड किलोने विक्री होत आहे, तर वांग्याचाही दर १०-१५ रुपये प्रतिकिलोवर स्थिर आहे. (Tomato Market)

१० रुपयांमध्ये चक्क दीड किलो टोमॅटो (Tomato) मिळतात. आगामी दिवसात भाव वाढण्याची चिन्हे दिसत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. (Tomato Market)

टोमॅटोच्या दरात घट कशामुळे झाली?

* उन्हामुळे पीक लवकर खराब होत असल्याने शेतकरी कमी दरात विकण्यास तयार होत आहेत.

* बाजारात टोमॉटोची आवक वाढल्याने मागणीपेक्षा पुरवठा जास्त आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांसमोरील आर्थिक अडचणीमध्ये वाढ झाली आहे. वाहतुकीचा खर्चही भरून निघत नाही. यामुळे शेतकरी टोमॉटो जनावरांना टाकत असल्याचे चित्र आहे.

परिस्थिती सुधारण्यासाठी काय करता येईल?

* शासनाने बाजार हस्तक्षेप करून किमान आधारभूत दर ठरवावा. शेतकऱ्यांनी प्रक्रिया उद्योगांसोबत करार करून टोमॉटो साठविण्याचे पर्याय शोधावेत.

शेतकऱ्यांना आर्थिक फटका

पुर्वी ६०-८० रुपये प्रतिकिलो असलेला टोमॉटो आता १० रुपये किलो मिळत आहेत. उत्पादनाचा खर्चही वसूल होत नसल्याने शेती करावी की नाही, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

हे ही वाचा सविस्तर : Market Update: उदगिर बाजारात सोयाबीन, हरभऱ्याच्या दरामध्ये आली तेजी..! वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रटोमॅटोशेतकरीशेती