Join us

आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोयाबीनला काय बाजारभाव मिळाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2024 18:13 IST

आज शनिवार दिनांक १० फेब्रुवारी २४ रोजी सोयाबीनचे बाजारभाव जाणून घेऊया

आज शनिवार दिनांक १० फेब्रुवारी रोजी अकोला बाजारसमितीत पिवळ्या सोयाबीनची २४१९ क्विंटल आवक झाली. कमीत कमी बाजारभाव ४२५० रुपये प्रति क्विंटल असा होता. कालच्या पेक्षा आजच्या कमीत कमी दरात २५० रुपयांनी वाढ दिसून आली. तर सरासरी दर ४४०० रुपये असे होते. कालच्या पेक्षा या दरातही ७५ रुपयांची वाढ दिसून आली.

आजचे सोयाबीनचे दर

वाशीम बाजारसमितीत सोयाबीनची केवळ ३०० क्विंटल आवक झाली. कालच्या तुलनेत १२०० क्विंटलने आवक कमी दिसून आली. या ठिकाणी सोयाबीनचे कमीत कमी दर कालच्या तुलनेत १०० रुपयांनी घटलेले दिसून आले. कमीत कमी दर ४२५० रुपये असे होते, तर सरासरी दर कालच्या तुलनेत ५० रुपयांनी घटून ४३५० रुपये प्रति क्विंटल असे दिसून आले.

धुळे बाजारसमितीत सोयाबीन ४२०५ रु प्रति क्विंटल या कमीत कमी दराने विक्री झाले, तर सरासरी दरही तितकाच होता.  लासलगावच्या विंचूर बाजारसमितीत सोयाबीनचा कमीत कमी दर प्रति क्विंटल ३ हजार इतका होता, तर सरासरी दर ४४५०रु इतका होता.

बाजारभावांच्या अधिक माहितीसाठी लोकमत ॲग्रोचे स्मार्ट बाजारभाव इथे पाहा

 

टॅग्स :सोयाबीनपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीशेती क्षेत्रशेतकरीशेती