हिवाळा आला की नागरिकांना महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीचे वेध लागतात. सध्या पुणेच्या पिंपरी फळबाजारात स्ट्रॉबेरी दाखल व्हायला सुरुवात झाली असून बाजारात २०० रुपये प्रतिकिलो दराने स्ट्रॉबेरीची विक्री होत आहे.
महाबळेश्वर तालुक्याचे मुख्य पीक म्हणजे स्ट्रॉबेरी आहे. स्ट्रॉबेरीचा मुख्य बहर नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात असतो. हा बहर जून महिन्यांपर्यंत सुरू राहतो. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात सर्वाधिक स्ट्रॉबेरी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होते.
पाचगणी आणि महाबळेश्वरमध्ये यंदा स्ट्रॉबेरीची लागवड कमी झाली आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी लागवड उशिरा झाली. त्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला.
यामुळे यंदा हंगाम १५ ते २० दिवस उशिराने सुरू झाला आहे. स्ट्रॉबेरी रंगाने लाल आणि दिसायला आकर्षक तसेच खायला आंबट-गोड आहे.
हे आहेत दर (प्रतिकिलो)
सफरचंद-१००-२००सीताफळ-६०चिकू-६०पेरू-५०डाळिंब-१४०मोसंबी-८०संत्रा- ५०ड्रॅगन फळ-१२०पपई- ४०किवी-१२०केळी ४०-५० रुपये डझन.
हेही वाचा : Farmer Success Story : सरकारी योजनेचा मिळाला आधार; गणेशरावांनी केली आर्थिक विषमतेवर मात