Join us

सोयाबीन उत्पादकांच्या पदरी दिवाळीनंतरही निराशा; पडत्या दराने हताश शेतकऱ्यांची भाववाढीची प्रतीक्षा कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 16:41 IST

हातातोंडाशी आलेला सोयाबीनचा घास अक्षरशः पावसाच्या पाण्यात वाहून गेला. जे काही शिल्लक राहिले, ते आता बाजारात कवडीमोल दरात विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. दिवाळीनंतर तरी भाववाढी होईल, अशी आशा होती. मात्र, पडते भाव कायम असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा येत आहे.

यंदाच्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला सोयाबीनचा घास अक्षरशः पावसाच्या पाण्यात वाहून गेला. जे काही शिल्लक राहिले, ते आता बाजारात कवडीमोल दरात विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. दिवाळीनंतर तरी भाववाढी होईल, अशी आशा होती. मात्र, पडते भाव कायम असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा येत आहे.

अशा प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांना किमान समाधानकारक दर मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, सध्या बाजारातसोयाबीनला कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. खुल्या बाजारात ३ हजार २०० ते ३ हजार ७०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत असून, हा दर हमीभावापेक्षा खूपच कमी आहे.

सोयाबीनची आवक वाढली

हिंगोली येथील बाजार समितीच्या मोंढ्यात सोयाबीनची आवक वाढत आहे. शनिवारी २०० क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आले होते. किमान ३ हजार ५०० ते ४ हजार २०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला, तर सरासरी ३ हजार २०० रुपयांचा भाव राहिला. येणाऱ्या दिवसात मोंढ्यात सोयाबीनची आवक आणखी वाढण्याची शक्यता आहे.

'पिवळ्या सोन्या'चे भाव स्थिर...

गतवर्षी सरासरी १४ ते १५ हजार रुपये क्विंटलने विक्री झालेल्या हळदीला यंदा १२ हजार ५०० रुपये भाव मिळत आहे, तर जास्तीत जास्त १४ हजार रुपयापर्यंत भाव जात आहे. सध्या येथील संत नामदेव मार्केट यार्डात एक ते दीड हजार क्विंटलची आवक होत आहे.

हाती येणाऱ्या उत्पन्नातून लागवड खर्चही निघेना

• सोयाबीन उत्पादकांना एकरी जवळपास १५ ते १८ हजार रुपयांचा लागवड खर्च येतो. यंदा उत्पादनात झालेली घट आणि पडत्या भावामुळे शेतकऱ्यांना लागवड खर्चही निघत नसल्याचे चित्र आहे.

• त्यातच हमीभाव केंद्रही सुरू झाले नसल्याने बाजार समित्यांच्या मोंढ्यात, खुल्या बाजारात पडत्या दरात सोयाबीनची खरेदी करण्यात येत आहे.

राज्यातील आजची सोयाबीन आवक आणि बाजारभाव (स्त्रोत : कृषि पणन मंडळ महाराष्ट्र राज्य) 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
27/10/2025
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल91397342004086
पुसद---क्विंटल1630380042504125
कारंजा---क्विंटल14000360044404195
मुदखेड---क्विंटल7405040504050
नायगाव---क्विंटल215410043504200
धुळेहायब्रीडक्विंटल104350041514005
सोलापूरलोकलक्विंटल496340043354100
अमरावतीलोकलक्विंटल20115365041003875
अमळनेरलोकलक्विंटल10380043004300
हिंगोलीलोकलक्विंटल1450370042003950
ताडकळसनं. १क्विंटल910360043004100
अकोलापिवळाक्विंटल2583400043604270
बीडपिवळाक्विंटल648340043504108
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळीपिवळाक्विंटल41410044014300
मनवतपिवळाक्विंटल1252340043004175
धरणगावपिवळाक्विंटल20350041003600
नांदगावपिवळाक्विंटल9425442544254
गंगापूरपिवळाक्विंटल21295141003850
किनवटपिवळाक्विंटल16385041003985
मुरुमपिवळाक्विंटल810370042804051
सेनगावपिवळाक्विंटल125385041004000
सिंदखेड राजापिवळाक्विंटल883380043004100
आष्टी-जालनापिवळाक्विंटल31411542554175
उमरखेडपिवळाक्विंटल240385040003950
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल620385040003950
राजूरापिवळाक्विंटल285305038503525
काटोलपिवळाक्विंटल1135315142403850
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल2000200043504000

हेही वाचा : नोकरीला नाकारत विठ्ठलरावांनी धरली शेतीची वाट; भाजीपाला शेतीतून ३ एकरांत कमावले उत्पन्न २८ लाख

English
हिंदी सारांश
Web Title : Soybean Farmers' Disappointment Continues After Diwali; Prices Fall, Hope Fades

Web Summary : Heavy rains damaged soybean crops, forcing farmers to sell at low prices. Post-Diwali, prices remain low, causing distress. Yields are down 50-60%, with market rates below support price. Farmers need immediate government support through procurement centers.
टॅग्स :सोयाबीनशेती क्षेत्रशेतकरीशेतीबाजार