Join us

सोयाबीनचे भाव यंदा प्रथमच साडेचार हजारांवर; येत्या काही दिवसात भाव वाढणार? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2024 17:09 IST

अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची २ हजार १६० क्विटंल आवक झाली काय मिळाला भाव वाचा सविस्तर

सोयाबीनला वर्षभरात पहिल्यांदा प्रतिक्विंटल ४ हजार ६८० रुपये भाव मिळाला आहे. यात साठवणूक केलेले सोयाबीन विक्रीसाठी बाजारात आले आहे. शनिवारी(८ सप्टेंबर) रोजी अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची २ हजार १६० क्विटंल आवक झाली व क्विंटलमागे सरासरी ४ हजार ३२५ ते जास्तीत जास्त ४ हजार ६८० रुपये भाव मिळाला आहे. 

आवक थोडी वाढताच सोयाबीनच्या दरात १०० रुपयांनी कमी आलेली आहे. महिनाभरात नवे सोयाबीन बाजारात विक्रीसाठी येत आहे. त्यामुळे साठवणुकीतील जुने सोयाबीन विक्रीकडे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचा कल आहे.

६ सप्टेंबर रोजी अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत हेच दर प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ६०० तर जास्तीत जास्त भाव ४ हजार ७४५ रूपयांवर पोहोचले होते. परंतु, सोयाबीनची आवक वाढताच या भावात घट होतांना दिसली. शनिवारच्या आकडेवारीवरून हे लक्षात आले. शेतकऱ्यांना मात्र भाववाढीची आणखी प्रतिक्षा आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत भाव मात्र अपेक्षित मिळत नाहीत. 

टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड