Join us

Soybean Market Update: सोयाबीनच्या दरातील घसरण थांबणार का? जाणून घ्या काय आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 12:10 IST

Soybean Market Update: एप्रिल महिन्याच्या प्रारंभीच सोयाबीनच्या दरात सुधारणा झाली आणि सोयाबीनचे दर सहा महिन्यानंतर साडेचार हजारांच्यावर पोहोचले होते. जाणून घ्या सविस्तर (Soybean Market Update)

Soybean Market Update : एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच सोयाबीनच्या दराने उसळी घेतली आणि सहा महिन्यांनी सोयाबीनच्या दराने साडेचार हजारांचा टप्पा ओलांडला. तथापि, तीनच दिवसांत सोयाबीनचे दर २५० ते ३०० रुपयांनी घसरले. (Soybean Market Update)

आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींचा सोयाबीनच्या दरावर परिणाम झाला होता. तथापि, सद्यस्थितीत बाजारात सोयाबीनची आवक कमी असल्याने सोयाबीनच्या दरातील घसरण थांबून पुन्हा तेजी येण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी शुक्रवारी (११ एप्रिल)रोजी वर्तविला आहे. (Soybean Market Update)

एप्रिल महिन्याच्या प्रारंभीच सोयाबीनच्या दरात सुधारणा झाली आणि सोयाबीनचे दर सहा महिन्यानंतर साडेचार हजारांच्यावर पोहोचले होते. अशातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह अनेक देशांवर 'रेसिप्रोकल टॅरिफ' (reciprocal tariff) अर्थात आयात होणाऱ्या वस्तूवर शुल्क लावण्याची घोषणा केली होती. त्याचा सोयाबीनच्या दरावरही परिणाम झाला. त्याचवेळी शासनाने नाफेड अंतर्गत खरेदी केलेल्या ३०० रुपयांनी ५ एप्रिल रोजी सोयाबीनचे दर घसरले.

सोयाबीनची विक्रीही सुरू केली होती. त्यामुळे ५ एप्रिल रोजी सोयाबीनचे दर ३०० रुपयांनी घसरले. दरम्यान, ट्रम्प यांनी 'रेसिप्रोकल टॅरिफ'च्या निर्णयाला ९० दिवसांची स्थगिती दिली, तर बाजारातही सोयाबीनची आवक कमी झाली आहे. त्यामुळे सोयाबीनच्या दरातील घसरण थांबली असून, शुक्रवारी महाराष्ट्रात सोयाबीनच्या दरात गेल्या चार दिवसांच्या तुलनेत सुधारणा झाल्याचे दिसले.

बाजारात सोयाबीनची मागणी वाढली

* सद्यस्थितीत बाजारात सोयाबीनची मागणी वाढली असून, डीओसीची स्थितीही सुधारली आहे. शुक्रवारी राज्यातील बहुतांश बाजार समित्यांत सोयाबीनचे दर ४ हजार ५०० रुपये प्रती क्विंटलपर्यंत पोहोचले होते. पुढे सोयाबीनच्या दरात सुधारणा होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तविली.

अमेरिकेने 'रेसिप्रोकल टॅरिफ'च्या निर्णयाला २० दिवसांची स्थगिती दिली आहे. शिवाय, शासनाने शासकीय खरेदीमधील सोयाबीनची विक्रीही थांबवली असून, बाजारात सोयाबीनची आवक कमी आहे. त्यामुळे सोयाबीनच्या दरात सुधारणा होत आहे. - आनंद चरखा, अध्यक्ष, व्यापारी युवा मंडळ, वाशिम

हे ही वाचा सविस्तर : Soybean Market Update: सोयाबीन दराने केला भ्रमनिरास; कुणी घरातच ठेवलं, तर कुणी बेभाव विकलं वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डबाजार समिती वाशिम