Join us

Soybean Market Update: सोयाबीनचा हमीभाव स्वप्नवत; खरिपात सोयाबीन पेरावे की नाही हा प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 17:35 IST

Soybean Market Update : गेल्या वर्षभरापासून शेतकऱ्यांना सोयाबीनच्या दरात स्थैर्य न मिळाल्यामुळे मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. एकीकडे उत्पादन खर्च वाढत असताना, दुसरीकडे बाजारात दर सतत घसरत चालले आहेत. परिणामी, सोयाबीनचा हमीभाव हा शेतकऱ्यांसाठी आजही केवळ स्वप्नवत ठरत आहे. (Soybean Market Update)

Soybean Market Update : गेल्या वर्षभरापासून शेतकऱ्यांना सोयाबीनच्या दरात स्थैर्य न मिळाल्यामुळे मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. (Soybean Market)

एकीकडे उत्पादन खर्च वाढत असताना, दुसरीकडे बाजारात दर सतत घसरत चालले आहेत. परिणामी, सोयाबीनचा हमीभाव हा शेतकऱ्यांसाठी आजही केवळ स्वप्नवत ठरत आहे. (Soybean Market)

सध्या राष्ट्रीय पातळीवर मागणी वाढल्याने सोयाबीनच्या दरात तेजी दिसून येत आहे. त्यामुळे खरिपाच्या तयारीपूर्वी शेतकरी साठवून ठेवलेले सोयाबीन विक्रीसाठी आणत आहेत; मात्र दरात सातत्याने होणारा चढ-उतार यामुळे बाजारात अनिश्चिततेचे वातावरण आहे. (Soybean Market)

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवरही सोयाबीनच्या दरात होत असलेली घसरण शेतकऱ्यांमध्ये संभ्रम करत आहे. परिणामी, शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री रोखत सावधगिरीचा पवित्रा घेतला आहे. त्यासोबत व्यापारीही विचारपूर्वक सोयाबीन विक्रीसाठी आणत आहेत. भविष्यात वाढ होईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. (Soybean Market)

दरात चढ-उतार कायमच !

खामगाव बाजार समितीत १७ एप्रिल रोजी सोयाबीनला ४,५५० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. या दिवशी सोयाबीनची आवक ३,२८१ क्विंटल झाली होती. त्यानंतर सोयाबीनचे दर कमी झाले, तर २५ एप्रिल रोजी सोयाबीनचे दर ४,४०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत घसरले. आधीच्या दिवशी ४,३५० रुपये दर होते. अर्थात सोयाबीनच्या दरातील चढ-उतार कायमच असल्याचे दिसून येते.

गेल्या आठवड्याच्या प्रारंभीच २१४५ क्विंटलची आवक !

* सोयाबीनच्या दरात सुधारणा होत असल्याने शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेले सोयाबीन विकण्यास काढले होते. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये आवक वाढत होती.

* मागील आठवड्याच्या प्रारंभीच रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत २,१४५ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. दरात घसरण होताच बाजारात आवक मंदावत गेली.

पाच हजारांवरून दोन हजारांवर आवक !

* आता मोजक्याच शेतकऱ्यांकडे सोयाबीन असले तरी व्यापारी मोठ्या प्रमाणात सोयाबीन विक्री करीत आहेत. मात्र, दरांची अनिश्चितता असल्याने खामगाव बाजार समितीत आवकेवर परिणाम दिसून येत आहे.

* एप्रिलच्या सुरुवातीला ५ हजार क्विंटल आवक होती, ती आता दोन हजार क्विंटलवर आली आहे. दरम्यान, शुक्रवारी बाजार समितीत १ हजार ८९३ क्विंटल आवक झाली होती.

अशी घटली सोयाबीनची आवक (दिवस आवक (क्विंटल)

१६ एप्रिल४२९९
१७ एप्रिल३२८१
२६ एप्रिल१८९३

दर सातत्याने घसरत असल्याने अजून सोयाबीन विकलेले नाही. जो दर मिळतो आहे, तो उत्पादन खर्चही भागवत नाही. अशी स्थिती राहिली तर सोयाबीनऐवजी पर्यायी पिकांचा विचार करावा लागेल. - कमलेश पाटील, शेतकरी

हे ही वाचा सविस्तर : Dharmabad Red Chilli: धर्माबादच्या लाल मिरचीचा तोरा पोहोचला सातासमुद्रापार वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड