Join us

Soybean Market Update: हमीभावाकडे झेपावणारा सोयाबीन दर गडगडला..! जाणून घ्या काय आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 11:18 IST

Soybean Market Update: हमीभाव केंद्रांना टाळे लागल्यानंतर जवळपास पावणेदोन महिन्याने बाजारपेठेत सोयाबीनचा (Soybean Market) भाव ४ हजार ६०० रुपयांपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या होत्या.

Soybean Market Update : हमीभाव केंद्रांना टाळे लागल्यानंतर जवळपास पावणेदोन महिन्याने बाजारपेठेतसोयाबीनचा (Soybean Market) भाव ४ हजार ६०० रुपयांपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या होत्या.

परंतु, दोनच दिवसांत पुन्हा दरात घसरण सुरु झाली आहे. शनिवारी ४ हजार ३०० रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला. परिणामी, बळीराजाच्या अपेक्षेवर पाणी फिरत आहे. (Soybean Market)

दोन वर्षांपूर्वी ऐतिहासिक भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचा सोयाबीन लागवडीकडे ओढा वाढला आहे. तद्नंतर मात्र सोयाबीनच्या दरात सातत्याने घसरण झाली. (Soybean Market)

मागच्या खरिपात लातूर जिल्ह्यात जवळपास ५ लाख हेक्टरवर पेरा झाला होता. मात्र, राशीनंतर हमीभावाच्या तुलनेत खुल्या बाजारातील दरात मोठा फरक होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी हमीभाव खरेदी केंद्रावर विक्रीसाठी धडपड सुरु केली होती. (Soybean Market)

नोंदणी केलेल्यांपैकी जवळपास ६० टक्के शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी झाली. मुदत संपुष्टात आल्यामुळे खरेदी बंद झाली. गुढीपाडव्यापासून बाजारपेठेत सोयाबीनच्या दरात वाढ होण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या होत्या. (Soybean Market)

३ एप्रिल रोजी तर यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४ हजार ६०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. त्यामुळे आगामी काळात आणखीन दर वाढतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र अवघ्या दोन दिवसातच दर उतरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. आता पुन्हा भाव वाढीची अपेक्षा लागली आहे. (Soybean Market)

आंतरराष्ट्रीय बाजारात दर उतरल्याचा परिणाम...

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन तेलाचे दर उतरले आहेत. तसेच डीओसीला मागणी नाही. परिणामी, देशातील सोयाबीनचे दर पुन्हा उतरले आहेत.देशातील डीओसीची निर्यात झाल्यास दर वाढू शकतात. परंतु, विदेशातील डीओसी स्वस्त आहे. त्यामुळे सोयाबीनचा भाव कमी आहे.

३ एप्रिल रोजी सोयाबीनला मिळाला उच्चांकी भाव...

यंदा हंगामात सर्वाधिक भाव ३ एप्रिल रोजी मिळाला. १२ हजार ८९८ क्विंटल आवक झाली होती. कमाल दर ४ हजार ७७०, सर्वसाधारण ४ हजार ६०० तर किमान भाव ४ हजार ११० रुपये प्रति क्विंटल मिळाला.

३०० रुपयांची घसरण....

गुरुवारी उच्चांकी दर मिळाला. अवघ्या दोन दिवसांत म्हणजे शनिवारी ४ हजार ३०० रुपये प्रति क्विंटल असा सर्वसाधारण दर मिळाला. तसेच कमाल भाव ४ हजार ४६१ तर किमान दर ४ हजार ४० रुपये प्रति क्विंटल असा राहिला.

आठवडाभरातील साधारण भाव कसे राहिले?

५ एप्रिल४३००
४ एप्रिल ४४७०
३ एप्रिल ४६००
१ एप्रिल४२७०
३० मार्च ४२००
२८ मार्च४२००
२७ मार्च४१००
२६ मार्च४०५०

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन तेल आणि डीओसीला मागणी नाही. अमेरिकेच्या आयात-निर्यात धोरणाचा आंतरराष्ट्रीय बाजारावर परिणाम झाला आहे. त्यामुळे पुन्हा दर उतरले आहेत. - अमोल राठी, सोयाबीन प्रक्रिया उद्योजक.

हे ही वाचा सविस्तर : Harbhara, Rabi Paddy: हरभरा, रब्बी धान विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू; 'या' केंद्रांवर होणार खरेदी वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड