राज्यात मागील महिन्याभरापासून सोयाबीनचे दर स्थिर असून शेतकऱ्यांना हमीभावही मिळत नसल्याचे चित्र आहे. भाववाढ होईल या आशेने अनेक शेतकऱ्यांवर सोयाबीनची साठवणूक करण्याची वेळ आली आहे.
आज राज्यात सकाळच्या सत्रात एकूण ११८२ क्विंटल सोयाबीनची आवक झाली.
पिवळा व लोकल जातीच्या सोयाबीनला आज साधारण ४३०० ते ४४०० रुपयांचा दर मिळाला. आज लातूर बाजारसमितीत ७१९ क्विंटल लोकल सोयाबीनची आवक झाली. क्विंटलमागे मिळालेला दर हा कमीतकमी ४४६० रुपये एवढा होता. तर सर्वसाधारण ४४७५ एवढा भाव सोयाबीनला आज मिळाला.
धाराशिव जिल्हा बाजारसमितीत आज ६० क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून सर्वसाधारण ४४५० रुपये क्विंटलमागे दर मिळाला. मागील चार दिवसांपासून धाराशिवमध्ये सोयाबीनच्या भावात फारसा बदल झालेला नाही.
पणन विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, बुलढाण्यात आज ७ क्विंटल पिवळ्या सोयाबीनला ४3०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. तर हिंगोलीत 65 क्विंटल पिवळ्या सोयाबीनला ४३२५ रुपये भाव मिळाला.
शेतमाल: सोयाबिन
दर प्रती युनिट (रु.)
जिल्हा | जात/प्रत | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|
29/04/2024 | |||||
बुलढाणा | पिवळा | 7 | 4300 | 4300 | 4300 |
धाराशिव | --- | 60 | 4450 | 4450 | 4450 |
हिंगोली | पिवळा | 65 | 4200 | 4450 | 4325 |
जालना | पिवळा | 28 | 4300 | 4511 | 4500 |
लातूर | पिवळा | 719 | 4460 | 4490 | 4475 |
परभणी | पिवळा | 103 | 4200 | 4450 | 4200 |
वर्धा | पिवळा | 35 | 3850 | 4350 | 4150 |
यवतमाळ | पिवळा | 165 | 4370 | 4400 | 4395 |
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील) | 1182 |