Join us

Soybean Market : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची आवक वाढली; राज्यात त्याचा काय होईल परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 13:13 IST

Soybean Market :अमेरिका, ब्राझीलमध्ये या देशात सोयाबीनचे बंपर उत्पादन झाले आहे त्यामुळे यंदा दर वाढण्याची आशा धुसर झाली आहे. त्याचा काय परिणाम होईल ते वाचा सविस्तर

Soybean Market : राज्यात सोयाबीनचाSoybean भावRate दिवसेंदिवस घसरत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरInternational अमेरिका, ब्राझील यांसारख्या प्रमुख सोयाबीन उत्पादक देशांत सोयाबीनचे यंदा चांगले उत्पादन झाले आहे.

त्यामुळे सोयाबीन भाव दबावात असून, येत्या काही महिन्यांतही सोयाबीनचा भाव वाढण्याची आशा धूसर असल्याचे व्यापाऱ्यांकडून घेतलेल्या माहितीतून स्पष्ट झाले आहे. खुल्या बाजारात सोयाबीनचा भाव दिवसेंदिवस घसरत आहे. सोयाबीनच्या भावात गुरुवारीही काहीशी नरमाई आली होती.

प्रक्रिया प्लांटसकडून मागणी कमी झाल्याने खुल्या बाजारात सोयाबीनचा सरासरी भाव प्रतिक्विंटल ३ हजार ९०० ते ४ हजार १०० रुपयांच्या दरम्यान आहे. सरकारची हमीभावाने खरेदी खूपच धिम्या गतीने सुरू आहे. यामुळे खुल्या बाजाराला याचा आधार मिळत नाही.

आंतरराष्ट्रीय बाजारातील भावही कमी झाले. त्यामुळे आगामी काही महिने सोयाबीन बाजारातील दबाव कायम राहण्याचा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. सरकारने सोयाबीन आणि हरभऱ्यासह सात शेतीमालाच्या वायद्यांवर तीन वर्षांपूर्वी बंदी घातली होती.

सरकारने जो दावा करून २० डिसेंबरपर्यंत वायदेबंदी केली, तो दावाच फोल ठरला आहे. प्रत्यक्षात त्यानंतरही बाजारात शेतमालाचे दर पडले आहेत. त्यामुळे २० डिसेंबरला वायदेबंदीची मुदत संपल्यानंतर सरकारने वायदे सुरू करावेत, अशी मागणी शेतकरी, व्यापारी आणि आयात-निर्यातदार करत आहेत.

सोयाबीनला मागच्या चार वर्षांतील नीचांकी भाव

* सोयाबीनला यंदा मिळणारा भाव हा मागील पाच वर्षांतील नीचांकी आहे.

* २०२०-२१ मध्ये सोयाबीनला ९ हजार २३५ रुपये प्रति क्विंटल, २०२१-२२ मध्ये ६ हजार ७१९ रुपये प्रति क्विंटल, २०२२ २३ मध्ये ५ हजार १६५५ रुपये प्रति क्विंटल, तर यंदा अर्थात २०२३-२४ मध्ये सोयाबीनला अवघा ४ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा भाव मिळत आहे.

काय म्हणतात व्यापारी...

अमेरिका आणि ब्राझील या प्रमुख सोयाबीन उत्पादक देशांत सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले. तर अर्जेंटिनातही सोयाबीनसाठी पोषक वातावरण आहे. अशात सोयाबीनच्या भाववाढीची शक्यता कमीच आहे. तथापि, भाव यापेक्षा कमी होण्याचीही शक्यता नाही. शासकीय खरेदी मोठ्या प्रमाणात वाढ झाली, तर सोयाबीनला फायदा होऊ शकतो.- आनंद चरखा, अध्यक्ष, व्यापारी युवा मंडळ, वाशिम

हे ही वाचा सविस्तर : Dal Market : हिवाळ्यात का घसरले डाळीचे भाव; काय मिळतोय भाव ते वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड