Join us

Soybean Market: 'मील' नव्हे, 'सीड' क्वालिटीलाही हमीभावाची मिळेना ग्वाही! वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 13:35 IST

Soybean Market : खरीप हंगाम तोंडावर आला असताना शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेले सोयाबीन विक्रीसाठी बाजारात आणले आहे. मात्र, बाजारात दरांनी पाठ फिरवली असून बीजवाई दर्जाच्या सोयाबीनलाही हमीभावापेक्षा (guaranteed price) कमी दर मिळत आहे. (Soybean Market)

वाशिम :  खरीप हंगाम तोंडावर आला असताना शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेले सोयाबीन विक्रीसाठी बाजारात आणले आहे. मात्र, बाजारात दरांनी पाठ फिरवली असून बीजवाई दर्जाच्या सोयाबीनलाही हमीभावापेक्षा (guaranteed price) कमी दर मिळत आहे. (Soybean Market)

मील क्वालिटी  (Meal Quality) सोयाबीनचा दर तर ४ हजार ३०० रुपयांपेक्षाही खाली गेला आहे, त्यामुळे शेतकरी हताश झाले आहेत. शेतकरी भाववाढीच्या अपेक्षेने साठविलेले सोयाबीन खरिपाच्या तयारीसाठी विकत आहेत.  (Soybean Market)

तथापि, बाजारात सोयाबीनची स्थिती बिकटच आहे. सद्यस्थितीत सीड क्वॉलिटी (Seed Quality) (बीजवाई) सोयाबीनलाच हमीभावापेक्षा (guaranteed price) कमी दर मिळत असून, मील क्वॉलिटी  (Meal Quality) सोयाबीनचे दर ४ हजार ३०० पेक्षाही कमी आहेत. त्यामुळे शेतकरी हताश झाले आहेत.  (Soybean Market)

सोयाबीन हे जिल्ह्यातील मुख्य आणि नगदी पीक म्हणून ओळखले जाते. या पिकावर शेतकऱ्यांचे संपूर्ण अर्थचक्र अवलंबून असते. नैसर्गिक आपत्तीने सोयाबीनचे उत्पादन घटले आणि बाजारात भाव पडले की शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट ओढवते.  (Soybean Market)

मागील वर्षीच्या खरीप हंगामातही नैसर्गिक आपत्तीचा फटका बसल्याने सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यातच बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरात प्रचंड घसरण झाली. दरात घसरण झाल्याने शेतकऱ्यांनी गरजेनुसारच सोयाबीनची विक्री केली. (Soybean Market)

भाव वाढतील, या अपेक्षेने अनेकांनी अद्यापही सोयाबीन साठविले आहे. तथापि, आता खरीप हंगाम तोंडावर आला असतानाही सोयाबीनच्या दरात सधारणा झालेली नाही. सोयाबीनला ४ हजार ८९२ रुपये हमीभाव (guaranteed price) जाहीर केला असताना त्यापेक्षा कमी दरात सोयाबीनची खरेदी होत आहे.  (Soybean Market)

बाजारात आवक वाढली!

शेतकरी खरिप हंगामाच्या तयारीत असल्याने ते साठवलेला शेतमाल विकून पैशांची जुळवाजुळव करीत आहेत. त्यातही शेतकऱ्यांकडे सोयाबीन मोठ्या प्रमाणात शिल्लक असल्याने याच शेतमालाची आवक बाजारात वाढू लागली आहे. आवक वाढत असल्याने दरात घसरण अधिकच होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

बीजवाईला केवळ ४,७०० चा दर!

वाशिमच्या बाजार समितीत सद्यस्थितीत बीजवाई सोयाबीनची आवक होत आहे. सोमवारी या बाजारात मील क्वालिटी सोयाबीनला कमाल ४ हजार ३०० रुपये प्रती क्विंटल, तर बिजवाई सोयाबीनला कमाल ४ हजार ७०० रुपये प्रती क्विंटलचा दर मिळाला. प्रत्यक्षात शासनाने ४ हजार ८९२ रुपये हमीभाव जाहीर केलेला आहे.

हे ही वाचा सविस्तर : Market Yard: पावसाच्या आगमनाने मार्केट यार्डात उडाली शेतकऱ्यांची तारांबळ वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनबाजारमार्केट यार्डबाजार समिती वाशिममार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती