Join us

Soybean Market: सोयाबीन ढेपची मागणी कमी होण्याचे काय आहे कारण जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 15:33 IST

Soybean Market : एक क्विंटल सोयाबीनमध्ये फक्त १६ किलो तेल निघते. उर्वरित ढेप (soybean meal) राहते. आंतरराष्ट्रीय बाजारात (Soybean Market) सोयाबीन ढेपला मागणी असते. परंतू यंदा मागणी का घटली त्याचे जाणून घ्या कारण सविस्तर

अकोला : एक क्विंटल सोयाबीनमध्ये फक्त १६ किलो तेल निघते. उर्वरित ढेप (soybean meal) राहते. आंतरराष्ट्रीय बाजारात (Soybean Market) यावर्षी डीओसीला मागणी नाही. डीओसीला मागणी नसल्याने सोयाबीनचे दर गेल्या वर्षभरापासून महिन्यात एक हजाराने कमी झाले आहेत.

सोयाबीनची शासन खरेदी बंद करण्यात आल्यानंतर सोयाबीनच्या दरात पुन्हा घसरण झालेली आहे. गेल्या एक महिन्यात सोयाबीनच्या दरात प्रतिक्विंटल हजार रुपयांनी घसरण झाली आहे. (soybean meal)

सोयाबीनला हमीभाव ४ हजार ८९२ रुपये असताना बाजार समित्यांमध्ये  (Soybean Market) ३ हजार ८०० रुपये क्विंटल दराने खरेदी सुरू आहे. त्यामुळे उत्पादन खर्च देखील निघणे कठीण असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

जिल्ह्यात सोयाबीन खरीप हंगामातील प्रमुख पीक असून, लाखो हेक्टरवर पेरणी करण्यात येते. यावर्षी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीमागे संकटाचे शुक्लकाष्ठ लागले आहे. सततच्या पावसाने सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे सरासरी उत्पादनात कमी झाले.  हंगामाच्या सुरूवातीपासूनच सोयाबीनच्या दरात घसरण आहे.

हरभऱ्याचे दर एक हजाराने कमी

* सोयाबीनसोबतच हरभऱ्याच्या दरातही घसरण झाली आहे. हरभऱ्याचे गेल्यावर्षीच्या तुलनेत एक हजाराने कमी दर आहेत.

* अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यंदा हरभऱ्याला ५ हजार ५०० रुपये क्विंटलचा भाव मिळत आहे, तर मागील वर्षी ६ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल मिळाला होता.

* त्यामुळे यंदा शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल एक हजार रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे.

शासकीय खरेदी सुरू असताना भाव कायम

* नाफेड खरेदीच्या काळात दरवाढ झालेली नसली तरी सोयाबीन ४ हजार १०० रुपये क्विंटलवर स्थिरावले होते.

हे ही वाचा सविस्तर : Sericulture Farming: राज्यात ४.४ हजार मेट्रिक टन रेशीम कोष उत्पादन; जाणून घ्या काय आहे कारण

टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड