बीड : आपल्या जिल्ह्यात पिकणारी बरीच पिके आपल्याला इतर जिल्ह्यांत जाऊन विकावी लागतात. आपल्याकडे आपल्या जिल्ह्यात विकता येईल, अशी मोठी मार्केट व्यवस्था नाही. मात्र, रेशीम कोषाबाबत (silkworms) तसे नाही.
रेशीम कोष विकायचा असेल तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची पसंती प्राधान्याने कृषी उत्पन्न बाजार समिती बीडच्या रेशीम कोष (silkworms) खरेदी केंद्राला आहे. २९ मार्च रोजी १८ टन ५ क्विंटल ९५० ग्रॅम एवढी विक्रमी अशी ऐतिहासिक आवक (arrival) नोंदविली गेली.
रेशीम कोष खरेदी केंद्र सुरू केल्यापासून आतापर्यंतची ही सर्वांत मोठी आवक आहे. राज्यभरातील विविध भागांतून शेतकऱ्यांनी आपला रेशीम कोष (silkworms) बीड येथील बाजार समितीच्या मार्केट यार्डात आणला (arrival) होता.
बाजार समिती सभापती, उपसभापती, संचालक मंडळ, प्रशासकीय अधिकारी व विशेषतः रेशीम कोष विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या योगदानातून हे घडू शकले असल्याचे संचालक धनंजय गुंदेकर यांनी सांगितले. केंद्राच्या स्थापनेपासूनचे रेकॉर्ड (Record) मोडीत निघाले असल्याचेही संचालकांनी सांगितले.
बीड येथील बाजारात राज्यातील शेतकरी रेशीम कोष (silkworms) विक्रीसाठी घेऊन येतात. रेशीम कोष खरेदी केंद्रात २४ ते ४८ तासांत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत असल्याने विश्वास वाढला आहे. राज्यात रेशीम लागवडीचे क्षेत्र वाढत असल्यामुळे, संचालनालयामार्फत बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येत आहे.