Join us

Silkworm Market: बीडमध्ये एकाच दिवशी 'इतक्या' किलो रेशीमकोषाची आवक वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 11:13 IST

Silkworm Market : कृषी उत्पन्न बाजार समिती, बीड मधील लोकनेते स्व. विनायकराव मेटे रेशीम कोष खरेदी केंद्रात १० मार्च रोजी रेशीम कोषाची आवक (Arrival) किती झाली आणि कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर (Silkworm Market)

Silkworm Market : कृषी उत्पन्न बाजार समिती, बीड मधील लोकनेते स्व. विनायकराव मेटे रेशीम कोष खरेदी केंद्रात  १० मार्च रोजी तब्बल १३,४८३ किलो रेशीम कोषाची आवक (Arrival) झाली. (Silkworm Market)

केवळ बीड तालुक्यातूनच नव्हे तर बारामती, नाशिक, इंदापूर ते थेट विदर्भामधून रेशीम कोष विक्रीसाठी बीड येथील खरेदी केंद्रात आणला जात असल्याची माहिती संचालक धनंजय गुंदेकर यांनी दिली आहे. (Silkworm Market)

उन्हाळी दिवसांमध्ये आवक ही साधारणतः ५ ते १० टनदरम्यान असते. मात्र, गेल्या काही दिवसांत बीड येथील मार्केटमध्ये आवक प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे.

रेशीम कोष खरेदी केंद्रातील सेवांबाबत बाजार समिती सभापती सरला कामराज मुळे, उपसभापती शामसुंदर पडुळे, सचिन जाधव यांच्यासह सर्व संचालक मंडळ व रेशीम विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे विशेष लक्ष असते. त्यामुळेच सध्या रेशीम खरेदी केंद्राबाबत रेशीम उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वास वाढला असून आवक वाढत चालली असल्याचे संचालक धनंजय गुंदेकर यांनी सांगितले. (Silkworm Market)

८ दिवसांच्या आत मिळते पेमेंट

सोमवारी रेशीम कोषाचा कमाल भाव ७३५ रुपये प्रति किलो होता. ८ दिवसांच्या आत शेतकऱ्यांचे पेमेंट त्यांच्या खात्यावर अदा केले जाते.

बाजारपेठेतील भाव

बीड येथील स्व. विनायकराव मेटे रेशीम कोष खरेदी केंद्रात १० मार्च रोजी १३,४८३ किलो आवक (Arrival) झाली.

प्रति किलोसाठी कमाल भाव ७३५ तर किमान भाव २०० रुपये होता. सरासरी भाव ६३५ रुपये होता.

विश्वासार्हता वाढल्याने बारामती, नाशिक, इंदापूर तसेच विदर्भातून रेशीम कोष विक्रीसाठी उत्पादक मार्केट कमिटीमधील रेशीम कोष खरेदी केंद्रात येत आहेत.

हे ही वाचा सविस्तर : Sericulture Farming: राज्यात ४.४ हजार मेट्रिक टन रेशीम कोष उत्पादन; जाणून घ्या काय आहे कारण

टॅग्स :शेती क्षेत्ररेशीमशेतीबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डबीड