Shetmal Hamibhav : बाजार समित्यांच्या (APMC) आवारात शेतमाल हमीभावापेक्षा (Shetmal Hamibhav) कमी दराने खरेदी करता येत नाही. तसा कायदा आहे. प्रत्यक्षात कायदा धाब्यावर बसवून अमरावती जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये एमएसपीच्या(MSP) आत शेतमाल (Shetmal Hamibhav) खरेदी होत आहे.
सद्य: स्थितीत सोयाबीन, कपाशी, तूर, हरभरा व कापसाची खरेदी हमीभावापेक्षा (Hamibhav) कमी दराने होत असल्याने शेतकरी अडचणीत आले आहे.
सरासरीपेक्षा जास्त पावसाने मागील वर्षीच्या हंगामात सोयाबीन, कपाशी व तुरीचे नुकसान झालेले आहे. सततच्या पावसामुळे पिकांवर कीड व रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने सरासरी उत्पादनात कमी आलेली आहे.
अशा परिस्थितीत मागणी वाढून दरात वाढ होण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा होती. प्रत्यक्षात शेतमाल हमीभावाच्या (Shetmal Hamibhav) आत विक्री होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
शेतमालास 'हमी'चे सरंक्षण केव्हा?
शेतमालास हमीभावाचे (Shetmal Hamibhav) संरक्षण मिळण्यासाठी 'सीसीआय'द्वारा कापूस व 'नाफेड'द्वारा सोयाबीनची खरेदी करण्यात आली. आता तुरीसाठी नोंदणी सुरू झालेली आहे.
प्रत्यक्षात शेतमाल खरेदी मंदगती असल्याने नोंदणीतील शेतकऱ्यांना प्रतीक्षेत राहावे लागते. त्यामुळे आर्थिक अडचणीतील शेतकरी मिळेल त्या भावात शेतमालाची विक्री करीत असल्याने मोठे नुकसान होत आहे.
शासनादेशाची रोज होत आहे पायमल्ली
२०० ते ३०० रुपयांच्या फरकात इतर शेतमाल आहे, तर सोयाबीन मात्र एक हजार रुपये कमी भावाने विकले जात आहे. त्यामुळे शासनाच्या आदेशाची बाजार समितीमध्ये (APMC) रोज पायमल्ली होताना दिसत आहे. (MSP)
सोयाबीन मातीमोल, एक हजाराने कमी
गेल्या वर्षी सर्वाधिक अडीच लाख हेक्टर क्षेत्र सोयाबीनचे होते. प्रत्यक्षात सोयाबीनला वर्षभरात हमीभाव मिळालेला नाही. येथील बाजार समितीमध्ये (APMC) सोयाबीनला चार हजार मिळालेला आहे.
नॉन एफएक्यू प्रमाणित केल्यानंतरच होईल विक्री
सहकार व पणन विभागाचे २१ नोव्हेंबर २०२२ च्या पत्रानुसार बाजार समितीत (APMC) गठित समितीद्वारा संबंधित शेतमाल नॉन एफएक्यू (FAQ) प्रतवारीचा असल्याचे प्रमाणित केल्यानंतरच त्याच्या लिलावास परवानगी दिल्या जाईल.
एफएक्यू ग्रेडपेक्षा शेतमालाची प्रतवारी कमी असल्यास तो एमएसपीपेक्षा (MSP) कमी भावाने विकला जातो. मात्र चांगल्या प्रतवारीचा शेतमाल एमएसपीपेक्षा (MSP) कमी दराने खरेदी-विक्री करता येणार नाही. - हरीश मोरे, सभापती
शेतमाल | सोमवारचे बाजारभाव | हमीभाव(सर्व भाव रुपये क्विंटलमध्ये) |
तूर | ७००० ते ७३६५ | ७५५० |
सोयाबीन | ३७०० ते ३९०० | ४८९२ |
हरभरा | ५२५० ते ५६०० | ५६५० |
कापूस | ७०७५ ते ७४२५ | ७५२१ |
हे ही वाचा सविस्तर : Wheat Market : नवीन गव्हाची बाजारपेठेत आवक; कसा मिळतोय दर ते वाचा सविस्तर