Join us

Shetmal Awak : उन्हाचा तडाखा! रिसोड बाजारात शेतमालाची आवक ३०% नी घटली वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 16:14 IST

Shetmal Awak : रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत (Risod market) वाढत्या उन्हाचा (summer) फटका बसताना दिसत आहे. हळद, सोयाबीन, तूर, हरभरा यांसारख्या शेतमालाची आवक (Shetmal Awak) ३० टक्क्यांनी घटली आहे. वाचा सविस्तर (Shetmal Awak)

Shetmal Awak : रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत  (Risod market) तापमानवाढीचा फटका (heat of the summer) बसताना दिसत आहे. हळद, सोयाबीन, तूर, हरभरा यांसारख्या शेतमालाची आवक (Shetmal Awak) ३० टक्क्यांनी घटली आहे. (Shetmal Awak)

उन्हाच्या कडाक्यामुळे रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाची आवक (Shetmal Awak) घटल्याचे दिसून येत आहे. शेतकरी अत्यावश्यकतेनुसारच साठवलेला माल विक्रीसाठी आणत आहेत. शुक्रवारी (२ मे) रोजी बाजार समितीमधील लिलाव झालेल्या शेतमालाच्या प्रमाणावरून हे स्पष्ट झाले. (Shetmal Awak)

जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. या हंगामाच्या तयारीसाठी हाती पैसा असणे आवश्यक असल्याने शेतकऱ्यांकडून साठविलेल्या शेतमालाची विक्री करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे या दिवसांतही बाजार समित्यांमध्ये (Risod market) चांगली आवक पाहायला मिळणे अपेक्षीत असते. यंदा मात्र, उन्हाच्या कडाक्याचा बाजार समित्यांवरही प्रभाव दिसत आहे. (Risod market)

मे महिन्यात प्रभाव वाढणार!

* एप्रिल महिन्यात तापमान वाढल्याने विविध व्यवसायांसह बाजार समित्यांमधील शेतमाल खरेदी प्रभावित झाल्याचे दिसत आहे.

* आता मे महिन्यात उन्हाची तीव्रता अधिकच वाढणार आहे.

* त्यामुळे बाजार समित्यांमधील शेतमालाची आवक अधिकच प्रभावित होण्याची शक्यता आहे.

३० टक्क्यांनी घटली आवक!

* रिसोड बाजार समिती अंतर्गत उन्हाच्या कडाक्यामुळे शेतमालाच्या आवकेवर परिणाम होत आहे.

* या बाजार समितीत प्रामुख्याने हळद, सोयाबीन, तूर आणि हरभरा या शेतमालाचीच खरेदी अधिक होते.

* उन्हाच्या कडाक्यामुळे मात्र या बाजार समितीमधील शेतमालाची आवकही प्रभावित झाली असून, मागील तीन दिवसांत येथील शेतमालाची आवक ३० टक्क्यांनी घटली आहे.

हे ही वाचा सविस्तर : Shetmal Awak: बाजारात शेतमालाची आवक का घटली; जाणून घ्या काय आहे कारण

टॅग्स :शेती क्षेत्ररिसोडबाजारमार्केट यार्डबाजार समिती वाशिमसोयाबीनतूरहरभरा