Join us

sesame jaggery Market : तीळ गुळ आताच घेऊन ठेवा; दर वाढण्याची शक्यता! वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 16:57 IST

मकर संक्रांतीचा सण महिनाभरावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे पांढऱ्या, काळ्या तिळाची मागणी वाढली आहे. (sesame and jaggery Market)

Til Gud  Market : मकर संक्रांतीचा सण महिनाभरावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे पांढऱ्या, काळ्या तिळाची मागणी वाढली असून, किरकोळ बाजारात तिळाचे दर १७० ते १७५ रुपये प्रतिकिलो आहेत.

उत्पादन कमी झाल्याने येत्या काही दिवसांत तिळाच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मकर संक्रांतीचा गोडवा महागणार आहे.

यंदाच्या खरीप हंगामात तीळ पेरणी काही जिल्ह्यात कमी प्रमाणात झाली. त्यातच अतिवृष्टीच्या तडाख्यात तीळ पिकाचे नुकसान झाले. मागील काही दिवसांपासून तिळाला मिळत असलेला १३ हजार ५०० ते १४ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर आता १० हजार ५०० रुपयांपर्यंत घसरला आहे.

सूर्याचे मकर राशीत संक्रमण होणारे पर्व म्हणजे संक्रांत. या दिवशी पारंपरिक पद्धतीने भारतीय संस्कृतीनुसार पूजन करून सण साजरा करतात. या कालावधीत हिवाळा असल्याने तिळाला मागणी असते.

कॅल्शियम व इतर महत्त्वाचे पौष्टिक घटक असल्याने तिळाचे विविध पदार्थ बनविले जातात. तर शत्रुत्व विसरुन स्नेहभाव वृद्धिंगत करण्यासाठी तीळगूळ, तिळाचे लाडू किंवा तीळगुळाचे पदार्थ एकमेकांना देऊन तीळगुळ घ्या, गोड बोला, असा संदेश मकर संक्रांतीला दिला जातो. सणामुळे तिळाला मागणी असते.

जानेवारीत येणाऱ्या संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर बाजारात तीळ, गूळ आणि तीळगुळाचे पदार्थ विक्रीसाठी बाजारात उपलब्ध होण्यास सुरुवात झाली आहे. तिळाचे दर यंदा मागील वर्षीच्या तुलनेत किलोमागे साधारण २५ ते ३० रुपयांनी कमी आहेत;  परंतु दिवसेंदिवस मागणी वाढणार असल्याने तिळाच्या दरात आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत.

सध्या बीड येथील किरकोळ बाजारात तिळाचे दर १६५ ते १७५ रुपये किलो आहेत. तर गुळाचे दरही मागीलवर्षीप्रमाणेच स्थिर असल्याचे व्यापारी सांगतात.

यंदा तीळगूळ महागणार !

यंदा उत्पादन वाढल्याने बाजारात आवक वाढली आहे. त्यामुळे तिळाचे सध्या किरकोळ दर १६५ ते १७५ रुपयांपर्यंत आहे. तर गुळाचे दरही गेल्यावर्षीच्या तुलनेत साधारण आहेत. त्यामुळे तीळगूळ यंदा महाग होण्याची शक्यता नसल्याचे व्यापारी सांगतात.

गेल्या वर्षी २००; यंदा १७०

गेल्या वर्षी संक्रांत काळात तिळाचा भाव २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला होता. यंदा मात्र काहीशी घसरण झाल्याने तिळाचा भाव १६५ ते १७५ रुपये किलो आहे.

गुळाचे दर यंदा स्थिर

गतवर्षी गुळाचे ठोक भाव ३ हजार ६०० ते ३ हजार ८०० रुपये क्विंटल होते. मागील महिन्यापासून नवीन गुळाचे उत्पादन बाजारात येत आहे. त्यामुळे किरकोळ भाव ४० ते ४५ रुपये किलो आहे. गावरान गुळाचा भाव ५५ ते ६० रुपये किलो आहे.

तिळाचे उत्पादन वाढलेमागील वर्षी नैसर्गिक आणि विविध कारणांमुळे तिळाच्या दरात तेजी होती. त्यामुळे किरकोळ बाजारात तिळाचा भाव २०० रुपयांपर्यंत पोहचला होता. मात्र यावर्षी तिळाचे उत्पादन भरपूर झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे दिवाळीनंतर तिळाच्या दरात किलोमागे दहा रुपयांची घसरण झाली. तर सध्या किरकोळ बाजारात १६५ ते १७५ रुपये किलो दर आहे.

गतवर्षी होता २४० रुपये किलोचा दर• गेल्यावर्षी तिळाचा दर प्रतिकिलो २२० ते २४० रुपये होता, तर तीन वर्षापूर्वी १०० ते १२० रुपये किलोपर्यंत तीळ मिळत होते. गतवर्षी तिळाच्या दरात दुप्पट वाढ झाली होती.• त्या तुलनेत सध्या तिळाचे दर कमीच आहेत. किरकोळ बाजारात मात्र तिळाचे दर १७० रुपये प्रतिकिलो आहेत. संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर तिळाचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

गुळाचा गोडवा कायम• तिळाचे दर आताच वाढले असले तरी गुळाचे दर मात्र स्थिर आहेत. मागील वर्षी ४० ते ४५ रुपये प्रतिकिलोवर असलेले गुळाचे दर यंदाही तेवढेच असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.• तथापि येत्या काही दिवसांत गुळाचे दरही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भाव स्थिर राहतील

यंदा बाजारात तिळाची उपलब्धता चांगली असल्याने मागणी वाढली. दर मागीलवर्षीपेक्षा तुलनेने स्थिर राहतील, असा अंदाज आहे. तीळगुळाचा भाव गेल्या वर्षीपेक्षा सध्या कमी आहे. -गंगाबिशन करवा, किराणा व्यापारी, बीड.

इतर राज्यांतून येणारा तीळही कमीच

सोयगावसह सर्वत्र तिळाचे उत्पादन कमी आहे. इतर राज्यांतून येणारा तीळही कमीच आहे. त्यामुळे आता १७० ते १७५ रुपये प्रतिकिलो दराने मिळणारा तीळ आणखी महागण्याची शक्यता नाकारता येत नाही. तथापि दरात किती वाढ होईल ते सांगणे कठीण आहे. -आनंद चौधरी, व्यापारी, पाचोरा

टॅग्स :शेती क्षेत्रबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड