Join us
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभरात दरात चढ-उतार, तुरीच्या भावात सातत्याने बदल का होतोय, जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 17:35 IST

Tur Market : गत महिनाभरात तुरीच्या दरात झालेली चढ-उतार शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी ठरली

धुळे : साडेआठ हजार रुपये क्विंटलपर्यंत दर मिळूनही, भाव आणखी वाढतील या अपेक्षेने तुरीची विक्री थांबविलेल्या शेतकऱ्यांच्या अपेक्षेवर पाणी फिरले आहे. बाजारातील अनिश्चितता आणि तुरीच्या दरात झालेली अचानक घसरण यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गत महिनाभरात तुरीच्या दरात झालेली चढ-उतार शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी ठरली असून, आता क्विंटलमागे थेट ४०० रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे.

भाववाढीच्या अपेक्षेने तुरीची विक्री रोखलीयंदा जानेवारीचा शेवटचा आठवडा आणि फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात तुरीला समाधानकारक भाव मिळाला. परंतु, भाव आणखी वाढतील, या आशेमुळे अनेक शेतकऱ्यांनी तूर विक्री थांबवली. परंतु, भाव वाढले नाहीत. उलट भाव घसरल्याने शेतकऱ्यांना फटका बसला आहे. शिवाय साठा करून ठेवलेल्यांचीही चिंता वाढली आहे.

भाव वाढीच्या आशेवर शेतकऱ्यांचा 'तोरा' फुसलासोयाबीननंतर आता तुरीच्या दराने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. बाजारात भाव अधिक वाढतील या आशेने तुरीची विक्री न करता साठवणूक करून ठेवलेल्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. तुरीच्या दरात मोठी घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक तोटा झाला असून, 'भाव वाढीच्या नादात तोटा' अशी अवस्था झाली आहे. 

शेतकऱ्यांनी मागील काही महिन्यांपासून तुरीचे भाव वधारतील या अपेक्षेने माल रोखून धरला होता. मात्र, बाजारपेठेतील अनिश्चितता आणि आवक वाढल्यामुळे तुरीचे भाव अचानक कोसळले आहेत. यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.

तुरीच्या भावात सातत्याने बदल का होताय?दरातील या चढ-उतारामागे प्रामुख्याने आयात धोरण जबाबदार आहे. विदेशातून तुरीची आवक वाढल्यास देशांतर्गत दर पडतात. तसेच, साठेबाजीच्या भीतीने प्रशासन वारंवार व्यापाऱ्यांच्या गोदामांची तपासणी करते, ज्यामुळे बाजारातील खरेदीचे व्यवहार संथ होतात. तूर ८ हजार ४०० रुपये दर असताना विकली नाही. मला वाटले नऊ हजार मिळतील. पण आता ७ हजार ७०० वर भाव आले आहेत. भाव वाढण्याच्या नादात माझा क्विंटलमागे ७०० रुपयांचा तोटा झाल्यचे शेतकरी सचिन चव्हाण यांनी सांगितले.

जिल्ह्यात लाल आणि सफेद तुर उपलब्ध होते. त्यात सर्वाधित लाल तुरीला मागणी असते, तुरीला अपेक्षित भाव मिळेल, या आशेवर शेतकऱ्यांनी लागवड केली होती. परंतू अवकाळी पावसाने तुरीचे मोठे नुकसान झाले परिणामी बाजारात चांगल्या प्रतिची तुर न आल्याने भाव मिळू शकला नाही. त्यामुळे प्रति क्किटल ४०० रूपयांचा फटका शेतकऱ्यांना बसतोय.- सुभाष कोटेचा, व्यापारी, धुळे

English
हिंदी सारांश
Web Title : Tur Dal Price Fluctuations: Farmers Face Losses Amid Market Volatility

Web Summary : Dhule farmers face losses as tur dal prices fluctuate after holding stock expecting higher rates. Import policies and hoarding checks contribute to market instability. Unseasonal rains also affected the quality, further impacting prices. Farmers are experiencing financial strain due to the price drop.
टॅग्स :शेती क्षेत्रमार्केट यार्डशेतीतुरा