Join us

Market Yard: आज सकाळच्या सत्रात कांदा, सोयाबीनला काय मिळतोय भाव?

By मुक्ता सरदेशमुख | Updated: February 17, 2024 13:33 IST

लासलगाव विंचूर बाजारसमितीत कांद्याला मिळतोय एवढा भाव, तर लातूर बाजारसमितीत सोयाबीनला...

राज्यात सकाळच्या सत्रात वेगवेगळ्या बाजारसमित्यांमध्ये २८ हजार ३१५ क्विंटल कांद्याची आवक झाली.  कांदा बाजारभावात घसरण सुरुच असून आज कांद्याला सर्वसाधारण ९७५ ते १४०० रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल भाव मिळाला.

नाशिक बाजारसमितीत लाल आणि पोळ कांद्याची आवक झाली. लासलगाव विंचूर बाजार समितीत आज  ११ हजार ५०० क्विंटल कांद्याची आवक झाली. लाल कांद्याला प्रति क्विंटल साधारण १२८० रुपये भाव मिळत असून पोळ कांद्याला साधारण १३०० रुपये दर मिळत आहे..

पुण्यातील पिंपरी व मोशी बाजारसमितीत लोकल कांद्याची आवक झाली असून  क्विंटलमागे ८०० ते १००० रुपये दर मिळाला.कराड बाजारसमितीत आज हालवा कांद्याची आवक झाली असून ९९ क्विंटल कांदा बाजारात दाखल झाला. प्रति क्विटल १४०० रुपये सर्वसाधारण दर या कांद्याला मिळाला.

जाणून घ्या कोणत्या बाजारसमितीत काय मिळतोय भाव..

साेयाबीनची काय स्थिती?

राज्यातील बाजारसमित्यांमध्ये सकाळच्या सत्रात १५६० क्विंटल सोयाबीनची आवक झाली. पिवळा, पांढरा आणि लोकल सोयाबीनला साधारण ४१०० ते ४६०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे.

लातूर बाजारसमितीत आज २५४ क्विंटल पांढऱ्या सोयाबीनची आवक झाली. ४४०० रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण दर सोयाबीनला सकाळच्या सत्रात मिळाला.नागपूर बाजारसमितीत लोकल सोयाबीनची आवक झाली. ४६१ क्विंटल सोयाबीनला सर्वसाधारण ४२८८ रुपये भाव मिळत आहे.

जाणून घ्या काय मिळतोय दर..

 

टॅग्स :मार्केट यार्डकांदासोयाबीन