नवी मुंबई : मलावी येथील केंट आंबा पहिल्यांदाच भारतीय बाजारपेठेत दाखल झाला आहे. मुंबईबाजार समितीमध्ये एक टन आवक झाली असून प्रतिकिलो ६२५ ते ६७५ रुपये दराने विक्री होत आहे. १५ जानेवारीपर्यंत हे आंबे उपलब्ध होणार आहेत.
दक्षिण पूर्व आफ्रिकेतील हापूससदृश व टॉमी अटकीन हे आंबे मागील काही वर्षांपासून नोव्हेंबरमध्ये भारतीय बाजारपेठेमध्ये उपलब्ध होत असतात. यावर्षी २८ नोव्हेंबरला या आंब्याची आयात झाली होती.
दोन्ही आंब्यांना ग्राहकांकडून प्रतिसाद मिळत आहे. आता मलावी येथील केंट आंबेही मंगळवारी बाजारसमितीमध्ये दाखल झाले आहेत, केंट आंब्याच्या २७० पेट्या दाखल झाल्या आहेत.
प्रति बॉक्स २५०० ते २७०० रुपये दर■ एका पेटीमध्ये ४ किलो आंबे आहेत. प्रतिबॉक्स २५०० ते २७०० रुपये दराने विकले जात आहेत.■ हे आंबे मुंबईसह पुणे, बंगळुरू, राजकोट, अहमदाबाद व दिल्ली येथे पाठविण्यात आले आहेत.■ पुढील १५ ते २० दिवस आंब्याची आयात सुरु राहील, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली