Join us

आज कापसाला किती मिळाला दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2024 21:21 IST

आजचे कापसाचे सविस्तर दर घ्या जाणून

सोयाबीन, कापूस, कांद्यासहीत कापसाच्या दराला अवकळा लागली असून हमीभावापेक्षा कमी दराता कापसाची विक्री होत आहे. पणन मंडळाच्या उपलब्ध माहितीनुसार आज केवळ दोन बाजार समित्यांमध्ये ७ हजारांपेक्षा जास्त दर मिळाला आहे. केंद्र सरकारने ७ हजार २० रूपये हमीभाव जाहीर केला असतानाही दर मिळत नाही ही शेतकऱ्यांची शोकांतिका आहे. 

दरम्यान, आज हायब्रीड, एल. आर.ए - मध्यम स्टेपल,  लोकल, लांब स्टेपल, मध्यम स्टेपल या कापसाची आवक झाली होती. हिंगणघाट येथे आजच्या दिवसातील सर्वांत जास्त म्हणजे ९ हजार क्विंटल कापसाची आवक झाली होती. तर अकोला बोरगावमंजू येथे १ हजार १२५ रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला असून धामणगाव रेल्वे आणि हिंगणघाट बाजार समित्यांमध्ये ६ हजार ५०० रूपये सरासरी दर मिळाला आहे. हा दर आजच्या दिवसातील सर्वांत कमी सरासरी दर होता.

आजचे कापसाचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
06/01/2024
सावनेर---क्विंटल3800680068256825
भद्रावती---क्विंटल536670070206860
समुद्रपूर---क्विंटल1865650070256800
परभणीहायब्रीडक्विंटल1780705071507080
धामणगाव -रेल्वेएल. आर.ए - मध्यम स्टेपलक्विंटल2400620069706500
घाटंजीएल. आर.ए - मध्यम स्टेपलक्विंटल2600675068506800
अकोलालोकलक्विंटल90675070206850
अकोला (बोरगावमंजू)लोकलक्विंटल112700072507125
देउळगाव राजालोकलक्विंटल3480640070406900
वरोरालोकलक्विंटल3514655070006800
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल1886670070006800
हिंगणालोकलक्विंटल18625067506600
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल1110655070406850
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल9000600071456500
हिमायतनगरमध्यम स्टेपलक्विंटल161660067006650
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल5550630071016950
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीकापूस