Join us

Zendu Market : झेंडूची मागणी वाढली; दसरा-नवरात्र सणांसाठी भावात तेजी अपेक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 14:20 IST

Zendu Market : सण उत्सवात झेंडूला मागणी वाढते. तीन महिन्यांत येणारे नगदी पीक शेतकऱ्यांना दिलासा देत असून यंदा बाजारात झेंडूची किंमत १०० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. आणि येत्या काळात भावात तेजी येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (Zendu Market)

Zendu Market : सण उत्सवात झेंडूला मागणी वाढते. तीन महिन्यांत येणारे नगदी पीक शेतकऱ्यांना दिलासा देत असून यंदा बाजारात झेंडूची किंमत १०० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. आणि येत्या काळात भावात तेजी येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.   (Zendu Market)

पारध व वळसावंगी परिसरातील पावसाळी हंगामात लागवड केलेल्या झेंडूच्या फुलांना यंदा बाजारपेठेत चांगली मागणी मिळत आहे. (Zendu Market)

मुंबई, नागपूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, बुलढाणा, अमरावती, हिंगोली आणि सोलापूरसारख्या शहरांतील फुलबाजारात झेंडूच्या फुलांना प्रतिकिलो ६० ते १०० रुपये दर मिळत आहेत.(Zendu Market)

मागणी मागील कारणे  

धार्मिक स्थळांवरील गर्दी, यात्रांचा हंगाम आणि विविध सण-उत्सव यांच्या पार्श्वभूमीवर झेंडूच्या फुलांची मागणी वाढली आहे. परिणामी, या परिसरातील शेतकरी खासगी वाहने वापरून थेट बाजारात झेंडू विक्री करत आहेत, ज्यामुळे त्यांना चांगला हमीभाव मिळत आहे.

शेतीमध्ये बदल  

पारध आणि वळसावंगी ही मिरची लागवडीसाठी प्रसिद्ध असून दरवर्षी येथे सुमारे ३० हजार हेक्टरवर मिरचीची लागवड केली जाते. मात्र यंदा फुलांच्या चांगल्या दरांमुळे अनेक शेतकरी झेंडूकडे वळत आहेत. झेंडू हे तीन महिन्यांत येणारे नगदी पीक असून, आठवड्याला तोडणीसाठी येतो. 

कमी वेळेत आणि कमी खर्चात मोठा नफा मिळवता येणे यामुळे शेतकऱ्यांमध्ये झेंडूची लागवड वाढत आहे.

भाव वाढण्याची शक्यता

यंदा पावसाळ्यात झेंडूची आवक तुलनेने कमी असल्याने बाजारात चांगले दर मिळत आहेत. दसरा, नवरात्र आणि दिवाळीसारख्या सणांच्या काळात झेंडूची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात झेंडूच्या भावात तेजी येण्याची शक्यता आहे.

झेंडू हे तीन महिन्यांत येणारे नगदी पीक असून आठवड्याला तोडणीसाठी येते. कमी खर्चात अधिक नफा मिळवता येतो. यंदा मागणी चांगली असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. - गणेश देशमुख, उत्पादक शेतकरी

हे ही वाचा सविस्तर : Halad Market : हळद विकायची कुणाला? व्यापाऱ्यांचा बेमुदत संप सुरू वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रफुलंफुलशेतीमार्केट यार्डमार्केट यार्डबाजार