Join us

Wheat Market : गहू बाजारभाव अपडेट: दौंड, सिल्लोडमध्ये भाव स्थिर वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 18:29 IST

Wheat Market : राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची आवक (Wheat Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Wheat Market : गहूबाजारात स्थिरतेचा सूर आहे. दौंड आणि सिल्लोडमध्ये आज गहूचे भाव २ हजार ६०० रु. प्रती क्विंटलच्या आसपास राहिले. मागणी आणि पुरवठ्याचा संतुलन शेतकऱ्यांना दिलासा देणारा ठरला आहे. (Wheat Market)

मागील काही दिवसांत गहूच्या बाजारभावात मोठा बदल दिसत नाही. आज दौंड व सिल्लोडमध्ये गहूचे दर स्थिर राहिले असून शेतकऱ्यांना सरासरी चांगला भाव मिळत आहे.(Wheat Market)

दौंड बाजार समितीत आज १७ क्विंटल गव्हाची आवक झाली, जिथे किमान दर २ हजार ३०० रुपये आणि जास्तीत जास्त दर हा २ हजार ६५१ रुपये प्रति क्विंटल नोंदला गेला. सरासरी दर २ हजार ६०० रुपये प्रती क्विंटल राहिला.(Wheat Market)

सिल्लोड बाजार समितीत अर्जुन जातीचे गहूचे दरही स्थिर राहिले. येथे ९८ क्विंटल गव्हाची आवक झाली, जिथे किमान दर हा २ हजार ५०० रुपये आणि जास्तीत जास्त दर २ हजार ६३० रुपये प्रति क्विंटल नोंदवला गेला. सरासरी दर हा २ हजार ६०० रुपये प्रती क्विंटल होता.(Wheat Market)

मागील काही दिवसांच्या तुलनेत बाजार भाव स्थिर आहेत. मात्र, पुढील काळात हवामान व बाजार परिस्थितीनुसार भाव बदलू शकतात.(Wheat Market)

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये गव्हाची आवक (Wheat Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : गहू

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
28/09/2025
दौंड२१८९क्विंटल17230026512600
सिल्लोडअर्जुनक्विंटल98250026302600

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Tur Bajar Bhav : लाल व पांढऱ्या तुरीला मागणी; आजचे भाव जाणून घ्या

English
हिंदी सारांश
Web Title : Wheat Prices Stable in Daund, Sillod Markets: Detailed Report

Web Summary : Wheat prices remained stable in Daund and Sillod, around ₹2600 per quintal. Daund saw 17 quintals arrive, while Sillod had 98. Market stability offers relief to farmers, though future prices may vary.
टॅग्स :शेती क्षेत्रगहूबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती