Urad Market Update : खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत उडदाला बुधवारी (२४ सप्टेंबर) उच्च भाव मिळाला. या दिवशी एकूण २७८ क्विंटल उडद आवक झाली. (Urad Market Update)
ज्यामध्ये उडदाला जास्तीत जास्त ६ हजार ७०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला, तर सरासरी दर ४ हजार ३५० रुपये इतका राहिला. (Urad Market Update)
भाव व आवक परिस्थिती
आवक कमी झाल्यामुळे बाजारात उडदाच्या भावात वाढ दिसून येत आहे. यंदा पावसाच्या अनियमिततेमुळे आणि बाजारातील मागणी-पुरवठा असंतुलनामुळे उडदाचा भाव चढत असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, येत्या काही दिवसांत भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर उडदाच्या चांगल्या भावामुळे समाधानाचे भाव आहेत. परंतु, भाव अनिश्चित असल्यामुळे ते भविष्यासाठी काळजी व्यक्त करत आहेत.
यंदा आवक कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना दरवाढीची अपेक्षा आहे, परंतु हवामानातील बदल आणि बाजारातील परिस्थिती भावावर मोठा प्रभाव टाकू शकतो.
भाववाढीचे कारण
आवक कमी होणे : पावसामुळे शेती कामावर परिणाम, ट्रान्सपोर्टमध्ये अडथळे.
मागणी जास्त असणे : घरगुती तसेच औद्योगिक वापरासाठी उडीदाला मागणी अधिक.
हवामानाचा परिणाम : पावसामुळे उडदाची काढणी व साठवणुकीवर परिणाम.
शेतकऱ्यांना सूचना
काढणी केलेले उडद त्वरित बाजारात आणणे, योग्य साठवणूक व्यवस्था ठेवणे आणि भावाच्या स्थितीवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आगामी काही दिवस पावसाचे सावट कायम राहणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांचे नियोजन योग्य प्रकारे करणे गरजेचे आहे.
हे ही वाचा सविस्तर : Halad Market : हळदीची भाववाढ का थांबली? जाणून घ्या सविस्तर
Web Summary : Urad prices surged due to reduced supply and weather impacts. Farmers see increased prices due to demand, but uncertain future conditions remain a concern. Farmers are advised for proper storage and market monitoring.
Web Summary : उड़द की आपूर्ति में कमी और मौसम के प्रभाव से कीमतें बढ़ीं। किसानों को मांग के कारण कीमतों में वृद्धि दिख रही है, लेकिन अनिश्चित भविष्य की स्थितियाँ चिंता का विषय बनी हुई हैं। किसानों को उचित भंडारण और बाजार की निगरानी की सलाह दी जाती है।