- किशोर मराठे गुजरात राज्यातील राजकोट येथील स्ट्रॉबेरी व्यापाऱ्याकडून वालंबा, डाब, आट्याबारी येथे शेतात प्रत्यक्ष येऊन ४४ शेतकऱ्यांकडून दोन टन लाल गर्द गोड रसाळ सातपुड्यातील स्ट्रॉबेरी खरेदी करण्यात आली आहे.
स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना सुरतच्या मार्केटला माल विक्रीसाठी न्यावा लागत होता, मात्र आता गुजरात राज्यातील व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या शेतात येऊन स्टाबेरी खरेदी चांगल्या भावाने खरेदी करत आहेत. स्थानिक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन व्यापारी खरेदी करत असल्याने समाधान व्यक्त केलं जात आहे.
सातपुड्याच्या हॅलो डाब, वालबा व आट्याबारी परिसरात तब्बल १४८ शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. यासाठी सुरवातीला पुण्यावरून स्ट्रॉबेरीची रोपे मागवली होती. शेतकऱ्यांच्या योग्य व्यवस्थापनांमुळे आता स्ट्रॉबेरी काढणीला आली. जवळपास महिनाभरापासून स्ट्रॉबेरी काढणी सुरु आहे. येथील शेतकरी स्ट्रॉबेरी सुरतच्या मार्केटला विक्रीसाठी नेत होते.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या विक्रीसाठी नेण्याच्या व इतर खर्च करावा लागत होता. मात्र आता गुजरात राज्यातील राजकोट येथील स्ट्रॉबेरीचे व्यापारी शेतकऱ्यांच्या शेतात येऊन एक नंबरच्या स्ट्रॉबेरी १८० रूपये, दोन नंबर १४० रूपये, तीन नंबर १०० रूपये किलो प्रमाणे ४४ शेतकऱ्यांच्या दोन टन (२०० किलो) सातपुड्याची स्ट्रॉबेरी व्यापाऱ्यांनी खरेदी केली आहे.
Web Summary : Gujarat traders are directly buying Satpuda strawberries from farmers' fields in Walamba, Dab, and Atyabari. Two tons were purchased from 44 farmers, fetching prices from ₹100 to ₹180 per kg, saving farmers transportation costs to Surat.
Web Summary : गुजरात के व्यापारी वालंबा, डाब और आट्याबारी में किसानों के खेतों से सीधे सतपुड़ा की स्ट्रॉबेरी खरीद रहे हैं। 44 किसानों से दो टन स्ट्रॉबेरी खरीदी गई, जिससे किसानों को सूरत तक परिवहन लागत की बचत हुई और ₹100 से ₹180 प्रति किलो का भाव मिला।